शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

50 प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक करत भाजपाची प्रचारात आघाडी; काँग्रेसवर कुरघोडी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 7:47 PM

भाजपाचं तीन महिने आधीच बुकिंग

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरू आहे. देशातील 90 कोटी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस, भाजपानं कंबर कसली आहे. यामध्ये सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपानं आघाडी घेतली आहे. ब्लूमबर्गनं दिलेल्या वृत्तानुसार, भाजपानं प्रचारासाठी 50 प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक केली आहेत. काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी तीन महिने आधीच भाजपानं हे बुकिंग केलं. निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरात असल्यानं नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. लांबचं अंतर कापण्यासाठी नेतेमंडळी प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टरला पसंती देतात. मात्र सध्याची मागणी पूर्ण करू शकतील, इतकी प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर देशात नाहीत. भाजपानं निवडणुकीसाठी 20 प्रायव्हेट जेट आणि 30 हेलिकॉप्टर बुक केली आहेत. तर काँग्रेसला केवळ 10 प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक करता आली आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत विरोधकांचं प्रचार अभियान अपयशी करण्यासाठी, त्यांच्या सभांची प्रयत्न केले जात असल्याचं बिझनेस एअरक्राफ्ट ऑपरेटर असोसिएशनचे सल्लागार आणि मार्टिन कन्सल्टिंगचे संस्थापक मार्क मार्टिन यांनी सांगितलं. मात्र यंदा प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक करण्यासाठी दिसत असलेली स्पर्धा याआधी कधीही पाहायला मिळाली नव्हती, असं ते म्हणाले. एका पक्षाच्या प्रचार अभियानाला धक्का देण्यासाठी दुसऱ्या पक्षानं प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर बुक केले. प्रायव्हेट जेट्स 45 दिवसांसाठी बुक करण्यात आली आहेत. एका प्रायव्हेट जेटचं भाडं 5700 डॉलर (जवळपास 4 लाख रुपये) आहे. तर हेलिकॉप्टरचं भाडं 7200 डॉलर (जवळपास 5 लाख रुपये) इतकं आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस