अलिबाग: रायगड लोकसभा मतदारसंघातील सेना-भाजपा युतीचे अधिकृत उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्याशी नामसाधर्म्य असलेले अपक्ष उमेदवार अनंत पद्मा गिते यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गीते यांचा अर्ज छाननीच्यावेळी अडचणीत आला. त्यांच्यासोबत अपक्ष उमेदवार योगेश कदम यांचादेखील अर्ज छाननीदरम्यान अडचणीत सापडला. गिते आणि कदम यांचे वकील रायगड जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या समोर उमेदवारी अर्ज कसे योग्य आहेत आणि बाद का ठरु शकत नाहीत, याबद्दल युक्तीवाद करत आहेत. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात काहीसे तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. निवडणूक निर्णय अधिकार्यांचा अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत छाननी अंतीची अंतिम उमेदवार यादी जाहीर होऊ शकणार नाही. त्यास काहीसा विलंब होईल, अशी माहिती रायगड लोकसभा मतदार संघाच्या मीडिया सेंटरनं दिली आहे.
रायगडमध्ये मोठा पेच; अनंत गितेंच्या अडचणी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 7:03 PM