शहरं
Join us  
Trending Stories
1
Prakash Ambedkar: वंचित कोणाला पाठिंबा देणार?; निकालाच्या आदल्या दिवशीच प्रकाश आंबेडकरांनी जाहीर करून टाकलं!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : योगायोग! उद्या निकाल लागणार, त्याच वेळी पहाटेच्या शपथविधीला पाच वर्ष पूर्ण होणार
3
Maharashtra Vidhan Sabha Results 2024: मुंबईतील 36 मतदारसंघांची  ‘येथे’ होणार मतमोजणी
4
'या' मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांचं पारडं जड, सत्तास्थापनेत किंगमेकरही ठरणार?
5
तुमचं Aadhaar कार्ड हरवलंय, आणि नंबरही लक्षात नाहीये; आता काय करावं लागेल? जाणून घ्या 
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: मुंबईतील २४ मतदारसंघांत महिलांचा 'मत'टक्का पुरुषांपेक्षा जास्त! 
7
छगन भुजबळ आणि माणिकराव शिंदे यांच्यात 'कांटे की टक्कर'; विक्रमी मतांचा फायदा कुणाला होणार?
8
दिंडोरीत पुन्हा घड्याळाची टिकटिक, की वाजणार तुतारी?
9
IND vs AUS : KL राहुलच्या विकेटसह पडली वादाची ठिणगी; खरंच चिटिंग झाली? (VIDEO)
10
Kalbhairav Jayanti 2024: शनिवारी चुकवू नका काल भैरवाची 'ही' उपासना; मिळेल सुख, दूर होईल निराशा!
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
12
Video - नवरा-नवरीला गिफ्ट द्यायला आला अन् खाली कोसळला; स्टेजवरच हार्ट अटॅकने मृत्यू
13
ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिना खानचं टीव्हीवर कमबॅक, Bigg Boss 18 मध्ये दिसणार
14
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
15
मुंबईत मतमोजणीची तयारी पूर्ण; २,७०० हून अधिक कर्मचारी, १० हजार पोलीस तैनात
16
करमाळ्यात कुर्डूवाडीसह ३६ गावे ठरणार गेमचेंजर; 'हा' फॅक्टर निर्णायक राहणार!
17
Adani Group Stocks: आरोपांनंतर अदानी समूहाचे शेअर्स आजही गडगडले; 'या' कंपनीला सर्वाधिक फटका
18
अभिनयक्षेत्रातून निवृत्ती घेणार का? अनिल कपूरला नाना पाटेकर म्हणाले- "माझ्याकडे काम नसेल तर..."
19
कोहलीचा 'विराट' संघर्ष कायम! हेजलवूडच्या अतिरिक्त उसळी घेणाऱ्या चेंडूवर 'किंग'ची झाली 'शेळी'
20
तेराव्या वर्षी सेल्समन म्हणून काम, आईकडून १० हजार घेऊन सुरू केला व्यवसाय, उभारला ३३ हजार कोटींचा ब्रँड

Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 6:58 PM

Madha vidhan sabha history: माढा विधानसभा मतदारसंघात काही अपवाद वगळले, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता राहिली आहे. 

लक्ष्मण कांबळे माढा विधानसभा मतदारसंघावर राज्य स्थापनेनंतर आतापर्यंत झालेल्या एकूण १३ सार्वजनिक निवडणुकीत काँग्रेस चार, शेकाप एक, अपक्ष तीन व उर्वरित पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या मतदारसंघावर अपक्ष व शेकाप पक्षाचे चार आमदार वगळता कायम काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आतापर्यंत सलग पाच वेळा या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता अबाधित राहिली आहे. १९५२ मध्ये मुंबई प्रांताचे आमदार म्हणून शेकापचे बाबूराव पाटील व १९५७ मध्ये काँग्रेसचे नामदेव जगताप यांनी या मतदारसंघाचे काम पाहिले आहे. 

एकाही आमदाराला मिळाली नाही मंत्रि‍पदाची संधी

गेल्या १३ पंचवार्षिक निवडणुकीत या मतदारसंघाने वेगवेगळे आमदार दिले आहेत. यामध्ये १९९५ निवडणुकीतून अपक्षसह सलग सहा वेळा आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. माढा विधानसभा मतदारसंघात राज्य स्थापनेपासून एकदाही शिवसेनेचा भगवा फडकला नाही. 

त्याचबरोबर या विधानसभा मतदारसंघात एकदाही महिलेला आमदार म्हणून संधी मिळालेली नाही. याचबरोबर या मतदारसंघातून निवडून आलेल्या कोणत्याही आमदाराला मंत्रिपदाची देखील संधी मिळालेली नाही. २००९ च्या निवडणुकीपासून माढा तालुक्याचा मतदारसंघ फुटून माढा ७८, पंढरपूर ४२ व माळशिरस १४ अशा एकूण १३४ गावांचा माढा विधानसभा मतदारसंघ झाला आहे.

१९६२ ते २०१९ माढात कधी कोण जिंकलं?

१९६२ च्या विनयकीये काँग्रेसने काशीनाथ अस्वरे हे विजयी झाले होते. त्यानंतर १९६७ मध्ये शेकापचे उमेदवार संपतराव पाटील विजयी झाले. यानंतर १९७२ च्या निवडणुकीत काँग्रेसचे विठ्ठलराव शिंदे हे निवडून आले. १९७८ मध्ये अपक्ष उमेदवार कृष्णाराव परबत यांनी बाजी मारली होती. 

१९८० च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावरून धनाजीराव साठे हे, तर १९८५ मध्ये अपक्ष उमेदवार पांडुरंग पाटील हे विजय झाले होते. त्यानंतर १९९० च्या दशकात पांडुरंग पाटील यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवत दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळवली होती. यानंतर अपक्ष उमेदवार म्हणून बबनराव शिंदे यांनी १९८५ च्या सार्वजनिक निवडणुकीत आपल्या सभापतीपदाच्या कालावधीनंतर निवडणुकीत प्रवेश केला आणि त्यांनी आमदारकी मिळवली.

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सलग पाचवेळा आमदार

राज्यात १९९९ च्या दरम्यान काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली आणि शरद पवार यांनी वेगळा पक्ष काढून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यादरम्यान तालुक्याचे अपक्ष असणारे आमदार बबनदादा शिंदे हे शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करून राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतःला उमेदवारी मिळवून विजयी झाले, तेव्हापासून आमदार बबनराव शिंदे यांनी २००४, २००९, २०१४, २०१९ अशी सलग पाच वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवून माढा विधानसभेवरती अबाधित सत्ता ठेवली आहे. 

आमदार बबनदादा शिंदे यांची एकूण सहा टर्म माढा विधानसभेतील सत्ता प्रस्थापित आहे. मुख्यमंत्री म्हणून (कै.) विलासराव देशमुख हे राज्यात कार्यरत असताना त्यांनी आपल्या मैत्रीचा मोबदला म्हणून धनाजीराव गणपत साठे यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल केली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४western maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024madha-acमाढाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस