नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माेदी सरकारवर महागाई आणि इंधन दरवाढीवरून जाेरदार टीका केली आहे. गॅस-डिझेल-पेट्राेल या ‘जीडीपी’मध्ये जाेरदार विकास केल्याचे ट्वीट करून राहुल गांधी यांनी माेदी सरकारला लक्ष्य केले.
राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये माेदी सरकारवर टीका करताना वृत्तपत्रांचे काही स्क्रीनशाॅट्स शेअर केले आहेत. त्यामध्ये घरगुती गॅस आणि इंधनाच्या किमतीची तुलना करण्यात आली आहे. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले, की माेदीजींनी ‘जीडीपी’ अर्थात गॅस-डिझेल-पेट्राेलच्या दरांमध्ये जाेरदार विकास करून दाखविला आहे. जनता महागाईने त्रस्त, माेदी सरकार कर वसुलीत मस्त.
स्क्रीनशाॅटमध्ये केलेल्या तुलनेत दाखविण्यात आले आहे, की घरगुती गॅसची एका सिलिंडरसाठी १ जुलैला जयपूरमध्ये ५९४.५ रुपये किंमत हाेती, तर ७ जानेवारी २०२१ला हीच किंमत ६९८ रुपये झाली आहे. तसेच डिझेलचे दर १ जुलैला ८१.३२ रुपये प्रतिलीटर हाेते, तर जानेवारीमध्ये ते ८३.६४ रुपयांवर पाेहाेचले आहेत, तर पेट्राेलचे दरही ८७.५७ रुपयांवरून ९१.६३ रुपयांवर पाेहाेचले आहेत. तामिळनाडूमध्ये मे महिन्यात विधानसभा निवडणूक हाेण्याची अपेक्षा असून, प्रचाराचे रणशिंग राहुल गांधी यांनी फुंकले आहे. सर्वप्रथम त्यांनी तमीळ अस्मितेवरून माेदींवर हल्लाबाेल केला हाेता.