नवी दिल्ली - आठ टप्प्यात होणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी २७ मार्चपासून सुरुवात होणार आहे. (West Bengal Assembly Elections 2021) दरम्यान, मतदानाला आता काही काळ ऊरला असताना पश्चिम बंगलामधील सध्याच्या राजकीय परिस्थितीचे चित्र दाखवणारे अजून एक ओपिनियन पोल समोर आले आहे. या ओपिनियन पोलमधून पश्चिम बंगालमध्ये भाजपा (BJP) सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. तर तृणमूल काँग्रेसची दुसऱ्या क्रमांकावर घसगुंडी होण्याची शक्यता आहे. बंगालमध्ये दीर्घकाळ सत्ता राहिलेल्या डाव्या पक्षांची काँग्रेससोबत मोठी घसरगुंडी होण्याची शक्यता आहे. (BJP to be big party in West Bengal, Trinamool to fall Number secound)मतदारांच्या मनातील कल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या हल्लीच्या काळातील विविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून इंडिया टीव्हीने महाओपिनियन पोल मांडला आहे. या आकडेवारीनुसार भाजपा पश्चिम बंगालमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरेल. मात्र बहुमतासाठी भाजपाला काही जागा कमी पडू शकतात. तर ममता बॅनर्जींचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर राहील. या महाओपिनियन पोलसाठी वापरण्यात आलेल्या विविध ओपिनियन पोलची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. पिपल्स प्लस च्या ओपिनियन पोलनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला १८३ जागा मिळू शकतात. तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला ९५ जागांवर समाधान मानावे लागू शकते. तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीला केवळ १६ जागा मिळतील. सीएनएक्सच्या ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही. २३ मार्च रोजी केलेल्या या ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेसला १४१ तर भाजपाला १३५ जागा मिळतील. कांग्रेस आणि डाव्या आघाडीला १८ जागा मिळतील. सी-वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये तृणमूल काँग्रेस बहुमत मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर राहील, असे म्हटले आहे. तृणमूल काँग्रेसला १६०, भाजपाला ११२ तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला २२ जागा मिळतील, असा या ओपिनियन पोलचा अंदाज आहे.
या सर्व ओपिनियन पोलचे सार म्हणून मांडण्यात आलेल्या महा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरेल. तर तृणमूल दुसऱ्या क्रमांकावर राहील. तर डाव्या आणि काँग्रेसच्या आघाडीला तिसरे स्थान मिळेल. महा ओपिनियन पोलच्या आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपाला १४३, तृणमूल काँग्रेसला १३२ आणि काँग्रेस-डाव्या आघाडीला १९ जागा मिळू शकतात.