Shiv Sena UBT vs Shiv Sena Shinde: महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अखेर मंगळवारी सुटला! ८५ जागांचा फॉर्म्युला निश्चित झाला असून, शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात मराठवाड्यातील १२ उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
भाजपातून आलेल्या नेत्याला संजय शिरसाटांविरोधात उमेदवारी
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने संजय शिरसाट यांच्याविरोधात भाजपातून आलेल्या राजू शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघात कोणाला उमेदवारी मिळणार, याची उत्सुकता होती. प्रदीप जैस्वाल यांच्याविरोधात किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
निष्ठावंताना पुन्हा उमेदवारी
शिवसेनेतील फुटीनंतर अनेक आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. साथ सोडणाऱ्या आमदारांमध्ये मराठवाड्यातील आमदारांची संख्या मोठी होती. यात परभणीचे आमदार राहुल पाटील, कन्नड आमदार उदयसिंह राजपूत, कैलास पाटील यांची नावे पहिल्या यादीत जाहीर करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मराठवाड्यातील उमेदवार
१) लोहा विधानसभा मतदारसंघ - एकनाथ पवार
२) कळमनुरी विधानसभा मतदारसंघ - डॉ. संतोष टारफे
३) परभणी विधानसभा मतदारसंघ - डॉ. राहुल पाटील
४) गंगाखेड विधानसभा मतदारसंघ - विशाल कदम
५) सिल्लोड विधानसभा मतदारसंघ - सुरेश बनकर
६) कन्नड विधानसभा मतदारसंघ - उदयसिंह राजपूत
७) संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघ - किशनचंद तनवाणी
८) संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघ - राजू शिंदे
९) वैजापूर विधानसभा मतदारसंघ - दिनेश परदेशी
१०) गेवराई विधानसभा मतदारसंघ - बदामराव पंडीत
११) धाराशिव विधानसभा मतदारसंघ - कैलास पाटील
१२) परांडा विधानसभा मतदारसंघ - राहुल पाटील