शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

Maharashtra Vidhan Parishad: आमदार गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ गोष्टीतील गाढव कोण?; तुम्हीच ऐका अन् सांगा...

By प्रविण मरगळे | Published: March 04, 2021 3:37 PM

Maharashtra Budget Session 2021, BJP MLC Gopichand Padalkar target State government: तर जो फुले, शाहू आंबेडकरांचा विचार तुम्ही महाराष्ट्रात मांडत होता, त्याला जनता नमस्कार करत होते, ते आता जनतेला माहिती आहे असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

ठळक मुद्देबेरोजगारांच्या बाबतीत घोषणा केल्या जातात मग १२ हजार आदिवासींची पदे रिक्त आहेतफुले शाहू आंबेडकरांची नावं घ्यायची अन पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची त्या लोकांनी याचं उत्तर द्यायला हवीतमराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम ठाकरे सरकार करतंय

मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला, पूजा चव्हाण आत्महत्या, मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यावरून पडळकरांनी विधान परिषदेत सरकारवर घणाघात केला, तसेच फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची असं सांगत गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.(BJP MLC Gopichand Padalkar Target Thackeray Government over various issue)  

विधान परिषदेत गोपीचंद पडळकर म्हणाले की, एका गावात मूर्तीकार होता, मूर्त्या बनवत होता, त्याच्याकडे एक गाढव होता, तो त्या गाढवावर मूर्त्या घेऊन गावोगावी फिरत होता, ओझं वाहणं गाढवाचं काम आहे, ज्यावेळी गाढवाच्या पाठीवर मूर्त्या असायचा तेव्हा गाढव पुढे पुढे जायचं, त्यावेळी गावातील माणसं त्याला नमस्कार करायची, कारण त्या गाढवावर हनुमानाची मूर्ती असायची, गणेशाची मूर्ती असायची, दत्ताची मूर्ती असायची लोकांना ती मूर्ती दिसायची आणि असचं महाराष्ट्रात घडलं, ज्यांनी फुले, शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, त्यांना महाराष्ट्रातील लोकांनी नमस्कार केला, त्यांना वाटलं हा नमस्कार मलाच आहे, ते गाढव मालकावर बिनसलं, तेव्हा मालकाने गाढवाला सांगितले, अरे गाढवा, ते तुला नमस्कार करत नाहीत तर तुझ्या पाठीवर ज्या मूर्त्या आहेत त्यांना नमस्कार करत होते, त्यामुळे फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावून जे फिरले त्यांना असं वाटलं की जनता त्यांना नमस्कार करतेय, पण असं नव्हतं, ते तुम्हाला नमस्कार करत नव्हते, तर जो फुले, शाहू आंबेडकरांचा विचार तुम्ही महाराष्ट्रात मांडत होता, त्याला जनता नमस्कार करत होते, ते आता जनतेला माहिती आहे असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

तसेच जर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर हे राज्य चालतं, पण पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती बिघडली, ६०० पैकी ३०० कोटींपर्यंत ठेवी कमी झाल्या, ज्या फुलेंच्या नावावर तुम्ही राज्यात जागर घालतायेत, त्या विद्यापीठाची अवस्था अशी करून ठेवली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा भत्ता गोठवला, त्यांची बाजू तुम्ही घेत  नाही, नुसतं भाषणात फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं पण असं चालणार नाही, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत, मागासवर्गीयांच्या भरतीतील आरक्षण कायमचं बंद केलं, ही तुमची विचारसरणी कुठली? बेरोजगारांच्या बाबतीत घोषणा केल्या जातात मग १२ हजार आदिवासींची पदे रिक्त आहेत, महाराष्ट्रातील अनेक जाती लाभांपासून वंचित आहे, मग फुले शाहू आंबेडकरांची नावं घ्यायची अन पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची त्या लोकांनी याचं उत्तर द्यायला हवीत असंही गोपीचंद पडळकरांनी सांगितले.  

दरम्यान, भाजपा(BJP) सरकारच्या काळात मराठा आरक्षणाला(Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हा राजकारणाचा विषय नाही, मराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम ठाकरे सरकार करतंय, या माध्यमातून सामाजिक समीकरण बिघडवली जात आहे, त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय, सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी सुरू होती, तेव्हा वकिलांकडे कागदपत्रे पुरवली नसल्याचं समोर आलं, मराठा आरक्षणासाठी वेळकाढूपणा केला जातोय असं सांगत पडळकरांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण