राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 10:20 AM2021-05-27T10:20:19+5:302021-05-27T10:24:56+5:30

गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार, यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत याच मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली होती. 

Maharashtra congress party may quit mahavikas aghadi government over reservation issue in promotion | राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..?

राज्य सरकार अडचणीत? आजच्या बैठकीत काय होणार, काँग्रेसच्या धमकीनंतर उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार..?

Next
ठळक मुद्देप्रमोशनमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमध्ये महाभारत सुरू आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच काँग्रेसने या मुद्द्यावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊतही या मुद्यावर अधिक आक्रमक आहेत.

मुंबई - प्रमोशनमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील उद्धव ठाकरे सरकारमध्ये महाभारत सुरू आहे. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात सुरू झालेला संघर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसाठी डोकेदुखी ठरू शकतो. मंत्रिमंडळाच्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत कॉंग्रेसचे मंत्री हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. (Maharashtra congress party may quit mahavikas aghadi government over reservation issue in promotion)

गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही कॉंग्रेसचे मंत्री नितीन राऊत, वर्षा गायकवाड आणि विजय वडेट्टीवार, यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत याच मुद्द्यावर गरमागरम चर्चा झाली होती. 

मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वीच काँग्रेसने या मुद्द्यावर सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची धमकी दिली आहे. यावरूनच काँग्रेसच्या भूमिकेचा अंदाज येऊ शकतो. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बुधवारी म्हणाले, या मुद्द्यावर पक्षाचे मत अतिशय स्पष्ट आहे आणि ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविण्यात आले आहे.

राज्यातील काँग्रेस पक्षाचे मंत्री दुःखी ; राधाकृष्ण विखे पाटील यांची टिप्पणी 

नितीन राऊतही आक्रमक -
राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊतही या मुद्यावर अधिक आक्रमक आहेत. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा आणि ज्येष्ठतेनुसार रिक्त सरकारी पदे भरण्याचा, राज्य सरकारने 7 मेरोजी काढलेला आदेश त्वरित रद्द व्हायला हवा, असे त्यांचे म्हणणे आहे.

ते स्पष्टपणे म्हटले आहे, की "हा शासन आदेश मागे घेतला गेला नाही, तर कॉंग्रेस महाविकस आघाडी सरकारमधून बाहेर पडेल," असा निर्णय पक्षात घेण्यात आला आहे. तसेच नाना पटोले यांनीही म्हटले आहे, की पदोन्नतीत आरक्षण ही एक घटनात्मक व्यवस्था आहे, त्यामुळे सरकार यावर वेगळी भूमिका घेऊ शकत नाही. 

आम्हाला विचारलंच नाही! 'त्या' निर्णयावर काँग्रेस नाराज; ठाकरे सरकारच्या अडचणी वाढणार?

Web Title: Maharashtra congress party may quit mahavikas aghadi government over reservation issue in promotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.