शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
2
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
3
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
4
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
5
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
6
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
7
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
8
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
9
'पुष्पा 2'नंतर 'पुष्पा 3' येणार की नाही? अल्लू अर्जुनच्या पोस्टमधून चाहत्यांना मिळालं उत्तर
10
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
11
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
12
गुरु प्रदोष: ८ राशींना अचानक धनलाभ योग, शुभ घडेल; इच्छापूर्ती, दत्तगुरु-महादेवांची कृपा!
13
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
14
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
15
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
16
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
17
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
18
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
19
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
20
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा

नियमांचं पालन करणं अहंकार कसा?, राज्यपालांनी अधूनमधून गोवा सरकारचं विमानही वापरावं: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 3:10 PM

Sanjay Raut on bhagat singh koshyari: ठाकरे सरकार अहंकारीपणे वागत असल्याची टीका भाजपकडून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्या सरकारी विमान प्रवासाला राज्य सरकारने परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन राज्याचं राजकारण चांगलंच तापताना दिसत आहे. ठाकरे सरकार अहंकारीपणे वागत असल्याची टीका भाजपकडून जात असताना शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. "राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आलं. सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणं, हा अहंकार आहे का?", असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. ते नवी दिल्लीत प्रसार माध्यमांशी बोलत होते. (Maharashtra Government deneid air travel to bhagat singh koshyari according to rules says sanjay raut)

नवा वाद! राज्यपालांच्या हवाई प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली; विमानातून उतरावं लागलं!

राज्यपाल कोश्यारी यांना आज उत्तराखंडसाठी सरकारी विमानानं प्रवास करण्याची परवानगी राज्यसरकारच्या सामान्य विभाग प्रशासनाकडून नाकारण्यात आली. यामुळे भगतसिंह यांना ऐनवेळी विमानातून उतरावं लागलं आणि खासगी विमानाची व्यवस्था झाल्यानंतर उत्तराखंडसाठी रवाना व्हावं लागलं. या घटनेबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचं पूर्णपणे समर्थन केलं. "राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात. राज्य सरकारने सूडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारलेले नाही. व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियमच आहे. उद्धव ठाकरे यांच्याजागी दुसरे कोणतेही मुख्यमंत्री असते तर त्यांनीही असंच केलं असतं. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यापाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधूनमधून गोवा सरकारचेही विमान वापरावे, थोडा भार त्यांच्यावरही टाकावा", असं संजय राऊत म्हणाले. 

"राज्यपालांना विमानातून उतरवलं, जनता सरकारला सत्तेतून खाली उतरवेल": सुधीर मुनगंटीवार

महाविकास आघाडी सरकार हे आतापर्यंतचं सर्वात अहंकारी सरकार असल्याची टीका राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी फडणवीसांच्या विधानाची जोरदार खिल्ली उडवली. "अहंकार हा शब्द कोण कुणाला उद्देशून म्हणतंय पाहा. हे आश्चर्यच आहे. कोण-कोणास म्हणाले? असे प्रश्न आम्हाला शाळेत असायचे. या संपूर्ण प्रकरणात अहंकाराचा प्रश्न येतोच कुठे? कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकार ज्याप्रकारे वागतंय ते जर नियमात बसत असेल तर केवळ राज्यापालांना विमान नाकारणं, हा अहंकार कसा काय असू शकतो?", असा खोचक सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे