शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

"केंद्र सरकारविरोधात महाराष्ट्र सरकार बंडखोरीच्या भूमिकेत; राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2020 11:40 PM

Prakash Ambedkar, Mahavikas Aghadi News: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचे भाकीत; केंद्र-राज्यात शह-काटशह

नवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेला कृषी कायदा लागू करणार नाही अशी बंडखोरीची भूमिका महाराष्ट्र सरकार घेत आहे. असाच अट्टहास राहिल्यास महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते असे भाकीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले.

आंबेडकर म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकारमध्ये एकमेकांच्या विरोधात शहकाटशह चालले आहे. आता कोरोना हा विषय आहे. त्याला दृष्टिक्षेपात ठेवून केंद्र सरकार आपत्ती व्यवस्थापनअंतर्गत काम करीत आहे. कृषी विधेयक पारित करणे हा त्याचाच एक भाग होता; परंतु राज्य सरकार हा कायदा लागू करणार नाही असे स्पष्ट सांगते तेव्हा ही एक प्रकारची बंडखोरी आहे. बंडखोरी करण्याचा अधिकार घटनेने कोणत्याही राज्याला दिला नाही.

केंद्र सरकारने एकदा आदेश काढला की त्याचे तंतोतंत पालन करणे राज्याचे काम आहे. राज्य सरकार त्याचे पालन करीत नसेल तर कलम २५६ अन्वये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट येऊ शकते.८५ टक्के जनतेचे काय?राज्य सरकारला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवर तोडगा काढता आला असता. मात्र, ही परीक्षा रद्द करताना सरकारने एकाच जातीचा विचार केला आहे. त्यांना राज्यातील इतर मागासवर्गीय, आदिवासी दिसले नाहीत. ८५ टक्के जनतेचे काय? असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. मराठा आंदोलनकर्त्यांना सरकारने विश्वास दिला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरagricultureशेतीPresident Ruleराष्ट्रपती राजवट