शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

Maharashtra Gram Panchayat Election Results: शिवसेनेनं 'करून दाखवलं'; महाविकास आघाडीच्या माध्यमातून ग्रामीण भागांत जोरदार मुसंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 6:54 PM

Maharashtra Gram Panchayat Election Results: काँग्रेस, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये शिरकाव; भाजपच्या वर्चस्वालाही धक्के

मुंबई: सत्तेचा फायदा सत्ताधारी पक्षाला सगळ्या निवडणुकांमध्ये होत असतो. शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीत मारलेल्या मुसंडीनं त्याचीच प्रचिती आली आहे. भारतीय जनता पक्षापासून फारकत घेऊन काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन करणाऱ्या शिवसेनेनं ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून ग्रामीण भागात जोरदार धडक दिली आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये चांगली कामगिरी केली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गावात शिवसेनेनं सरशी साधली. विशेष म्हणजे पाटील यांनी शिवसेनेला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. मात्र तरीही खानापूरमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला. शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकरांनी खानापूरमध्ये पाटलांना शह दिला. पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर गावात शिवसेनेनं राष्ट्रवादीला धक्का दिला. पुणे-बंगळुरू महामार्गालगत असलेल्या खेज शिवापूरमध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कोंडे यांच्या पॅनेलनं ११ पैकी ९ जागांवर विजय मिळवला.गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष?, हसन मुश्रीफांची चंद्रकांत पाटलांवर टीकासांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळे, घरनिकी, तळेवाडी, लेंगरेवाडी, देशमुखवाडी आणि धावडवाडी या ग्रामपंचायती तर खानापूर तालुक्यातील माहुली, नागेवाडी, खंबाले, पारे, रेणावी, देवेखिंडी, भडकेवाडी आणि दंडुळगाव या ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या आहेत. यामध्ये शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी ल्हासुर्णे, मंगळापूर, किन्ही आणि कटापुर या ग्रामपंचायती नव्याने जिंकल्या आहेत."ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा, भाजपाची मोठी पीछेहाट"मराठवाडा आणि कोकणात शिवसेनेची चांगली ताकद आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेची पक्षसंघटना फारशी मजबूत नाही. मात्र आता महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटक पक्ष आणि त्यातही मुख्यमंत्रिपद असल्यानं शिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संघटनेचा फायदा अनेक ठिकाणी शिवसेनेला झाला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस