Maharashtra Gram Panchayat: पृथ्वीराज चव्हाण यांना मोठा धक्का; कराड-शेनोली शेरेगावात भाजपचा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 09:50 AM2021-01-18T09:50:44+5:302021-01-18T10:04:07+5:30
Gram Panchayat Election Result: राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. हिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे.
कराड : ग्राम पंचायत निवडणुक ही मोठमोठ्या नेत्यांसाठी खूप महत्वाची आहे. हे नेते जरी थेट निवडणुकीत उतरलेले नसले तरीही त्यांची पॅनेल ही जिल्ह्यात वर्चस्व कोणाचे हे ठरविणार आहेत. अशातच कराडमधून एक मोठी बातमी येत आहे.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांना भाजपाने जोरदार धक्का दिला आहे. शेनोली शेरेगावात भाजपाने विजय मिळविला आहे. राज्यातील विविध भागातील ग्राम पंचायतींचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. पहिला निकाल जाहीर करण्याचा मान हा कोल्हापूरला मिळाला आहे.
फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीतील कोळकी गावचा निकाल नुकताच जाहीर झाला असून अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. कोळकीच्या निवडणुकीत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वत: लक्ष घातले होते. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांनी पॅनल उभे केले होते मात्र असे असताना देखील भाजप पुरस्कृत श्रीराम पॅनेलच्या एकाही उमेदवाराचा विजय झाला नाही. या ठिकाणी भाजपची सपशेल हार झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या उमेदवारांना जरी यश आले असले तरी अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार विजयी झाले आहेत.
बिनविरोधमध्ये सरशी कोणाची?
राज्यातील ३४ जिल्ह्यांतील १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल सोमवारी लागणार असून गावचे कारभारी कोण असणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यातच राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रा. पं.तींची आकडेवारीही लक्षनिय आहे. बिनविरोधच्या आकडेवारीत शिवसेनेने भाजपाला मागे टाकले आहे. यामुळे आजचे सर्व ग्राम पंचायतींचे निकाल सारे चित्र स्पष्ट करणार आहेत.
अनेकांनी ग्राम पंचायत बिनविरोध केल्यास अमूक एवढा निधी देऊ वगैरे आश्वासने दिली होती. यामुळे राज्यातील बिनविरोध झालेल्या ग्रा.पंचायतींची आकडेवारीही मोठी आहे. यामध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारलेली असली तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपा या पक्षांच्या ताब्यात किती बिनविरोध ग्रामपंचायती गेल्या हे पाहणे औत्सुक्याचे आहे. स्थानिक आघाड्यांना 520 ग्राम पंचायती बिनविरोध करता आल्या आहेत. तर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून एकमेकांचे वैरी बनलेल्या शिवसेना भाजपामध्ये खरी चुरस आहे. मोठा कोण हे दाखविण्याचा प्रयत्न या निवडणुकीत केला जाणार आहे. तुर्तास शिवसेनेकडे जास्त ग्राम पंचायती आहेत. शिवसेनेकडे २७८ तर भाजपाकडे २५७ ग्राम पंचायती आल्या आहेत. यापाठोपाठ राष्टवादीकडे २१८ ग्रामपंचायती तर काँग्रेसकडे १२४ ग्राम पंचायती आल्या आहेत. मनसेकडे ५ ग्राम पंचायती आहेत.