Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 05:30 PM2024-10-23T17:30:44+5:302024-10-23T17:34:20+5:30

NCP Candidate List: अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची पहिली यादी याहीर केली. पहिल्या यादीतून अजित पवारांनी सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केला गेल्याचे दिसत आहे.  

Maharashtra Vidhan Sabha 2024: How many Maratha candidates in NCP first list? | Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?

Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Ajit Pawar: अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. विधानसभा निवडणुकीत अनेक मुद्दे असून, यात एक मराठा ओबीसी हा फॅक्टरही महत्त्वाचा दिसत आहे. त्याबद्दलची काळजी अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतली गेल्याचे दिसत आहे. 

महायुतीमध्ये ज्या जागांचे वाटप झाले आहे, त्या जागांवरील उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. २८८ पैकी १८२ जागांचे वाटप झाले असून, यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ३८ जागा मिळाल्या आहेत. 

मराठा समाजातील उमेदवार किती? 

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ३८ उमेदवारांची नावे जाहीर केली. बहुतांश ठिकाणी विद्यमान आमदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर चार नवीन चेहरे आहेत. यात १७ उमेदवार हे मराठा समाजातील आहेत.  

 कोणत्या समाजातील किती उमेदवार?

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ५  ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी दिली आहे. २ उमेदवार मुस्लीम समुदायातील आहेत. ५ उमेदवार मागासवर्गीय असून, २ अनुसूचित जातीतील उमेदवारांचा समावेश आहे. बहुतांश जुन्याच नेत्यांना संधी दिली गेली असली, तरी सामाजिक समीकरणांचा विचार करत पहिली यादी जाहीर केल्याचे दिसत आहे. 

मराठवाड्यातून कोणाला उमेदवारी?

पहिल्या यादीत मराठवाड्यातील काही मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यात परळीतून धनंजय मुंडे, उदगीरमधून संजय बनसोडे, माजलगावमधून प्रकाश सोळंके, वसमतमधून राज नवघरे, पाथरीमधून निर्मला विटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2024: How many Maratha candidates in NCP first list?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.