ओलीस ठेवता का? भीक देत नाही; अजित पवार-फडणवीसांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुंपली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 13:01 IST2021-03-01T12:59:55+5:302021-03-01T13:01:26+5:30
Maharashtra Budget Session 2021: Maharashtra Vidhi Mandal Budget Session clash of Ajit Pawar and Devendra Fadnavis : वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेच्या विषयावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

ओलीस ठेवता का? भीक देत नाही; अजित पवार-फडणवीसांमध्ये अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जुंपली
मुंबई: विधिमंडळाच्या अधिवेशनाला आजपासून मुंबईत सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. वैधानिक विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय विधिमंडळात गाजताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावरून सरकारला धारेवर धरलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक चकमक झाली.
माझं कुटुंब माझी जबाबदारी हा देशातील अभिनव उपक्रम, राज्यपालांकडून ठाकरे सरकारचं कौतुक
वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार निर्णय का घेत नाही?, अशी प्रश्नांची सरबत्ती मुनगंटीवार यांनी केली. त्यावर अजित पवारांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारची अडवणुकीकडे लक्ष वेधलं. विकास महामंडळ आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील, त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असं पवार म्हणाले.
"धडधडीत खोटं बोलावं लागतं तेव्हा नैतिक बळ येत नाही", फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
अजित पवारांनी १२ आमदारांचा विषय उपस्थित करताचा देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. दादांच्या पोटातलं आता ओठांवर आलं. १२ आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलीस ठेवलं आहे का, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचं आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, अशा शब्दांत फडणवीस पवारांवर बरसले. आमचं म्हणणं ऐकलं जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचं असेल तर आम्हाला बसवता कशाला, अशा शब्दांत त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला.