शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
2
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
3
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
4
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
5
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
8
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
9
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
10
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
11
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
12
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
13
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
14
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
15
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
16
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
17
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
18
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
19
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
20
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली

Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 6:08 PM

Maharashtra Assembly election 2024: महायुतीतील तिन्ही पक्षांनी काही जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. यात कल्याण पूर्व मतदारसंघ भाजपाकडे गेला आहे. अपेक्षेप्रमाणे गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 

मुरलीधर भवार, कल्याणkalyan east vidhan sabha 2024 Update: भाजपाने पक्षाचे विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी घोषित केली आहे. त्या २४ ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र कल्याण पूर्वेतील महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद काही संपुष्टात आलेला नाही. शिंदे गटातून इच्छुक असलेले विशाल पावशे हे निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. येत्या दोन दिवसात उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पावशे यांनी स्पष्ट केले आहे.

अपक्ष लढणार की...

कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून विशाल पावशे निवडणूकीचा अर्ज अपक्ष उमेदवार म्हणून दाखल करतात की, अन्य कोणत्या दुसऱ्या पक्षात उडी मारुन उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतात. हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. उमेदवारी अर्ज ते जेव्हा दाखळ करतील तेव्हा ते कोणत्या पक्षाकडून लढणार आहे हे त्याच वेळी स्पष्ट होणार आहे. पावशे यांच्या निर्धारामुळे महायुतीत अस्वस्थता वाढली आहे.

निवडणूकीच्या आजार संहिता जाहिर होण्यापूर्वीच पावशे यांनी निवडणूकीची तयारी केली होती. त्यांनी गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने आमदार गायकवाड यांच्या विरोधात बॅनरबाजी केली होती. 

महेश गायकवाडही इच्छुक

या मतदारसंघातून शिंदे शिवसेनेचे महेश गायकवाड हे देखील इच्छुक आहेत. त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली आहे. त्यात त्यांनी वेळ आली आहे. जनसामान्यांची ताकद दुनियेपर्यंत पोहचविण्याची. वेळ आली आहे. आपला उमेदवार आपणच निवडायची.

दुसरीकडे शिंदे सेनेचे विधानसभा प्रमुख निलेश शिंदे हे देखील कल्याण पूर्वेतून इच्छूक होते. मात्र महायुतीतील भाजपने आमदार गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिल्याने निलेश शिंदे हे  प्रचंड नाराज आहे. या तिन्ही इच्छूकांची नाराजी दूर करण्यात शिंदे सेनेला यश येते की नाही हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024kalyan-east-acकल्याण पूर्वBJPभाजपाShiv Senaशिवसेना