शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
4
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
5
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
6
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
7
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
9
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
10
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
11
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
12
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
13
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
14
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
15
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
16
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
17
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
18
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
19
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
20
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."

सायन सर्कल परिसरातील भाजपाच्या आंदोलनावर पोलिसांची मोठी कारवाई, नेते, कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 6:22 PM

police action on BJP agitation in Sion Circle area : अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू होते.

मुंबई - परमबीर सिंह यांनी पत्रामधून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांमुळे राज्य सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान, अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने कमालीचा आक्रमक भूमिका घेतली आहे. आज मुंबईसह राज्यातील विविध भागांत भाजपाच्या नेत्यांनी जोरदार आंदोलने केली. दरम्यान, मुंबईतील सायन सर्कल परिसरात आंदोलन करणाऱ्या भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (police action on BJP agitation in Sion Circle area, leaders and activists arrested)

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांकडून आंदोलन सुरू होते. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकांवर कारवाई करत भाजपा नेत्या चित्रा वाघ, प्रसाद लाड यांच्यासह भाजपाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि हे आंदोलन पांगवले.

दरम्यान,  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश दिले होते, असा धक्कादायक खुलासा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. ही राज्याच्या दृष्टीने अत्यंत शरमेची व भयावह बाब असून यासंदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुख यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा व या संदर्भात स्वतः खुलासा करावा, या मागणीसाठी आज मुंबई भारतीय जनता पार्टीच्या वतीने दादर रेल्वे स्थानकाबाहेर तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई प्रभारी आ. अतुल भातखळकर, आ. योगेश सागर, आ. राम कदम, आ. पराग अळवणी, आ. सुनील राणे, आ. मिहीर कोटेचा, आ. पराग शहा यांच्यासह अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना अटक केली. 

टॅग्स :BJPभाजपाAnil Deshmukhअनिल देशमुखParam Bir Singhपरम बीर सिंगPoliticsराजकारण