जामनेर जि. जळगाव : लोंढ्री ता. जामनेर येथील बुथ क्रमांक तीन वर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारांनी नवीन मशीनची मागणी केली. या बुथवर आतापर्यंत ७३ जणांनी मतदान केले आहे. नव्याने पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. या मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान सुरूजिल्ह्यातील ५६६ ग्रामपंचायतींसाठी आज सकाळ पासून मतदान सुरू झाले आहे. सकाळी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींची निवडणूक राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली होती. अर्ज माघारीपर्यंत ५५ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. एकूण १ हजार ९५२ मतदान केंद्रांवर १२ लाख ८४ हजार १०९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या निवडणुकीसाठी २ हजार ५६० बॅलेट युनिट तर तितकेच कंट्रोल युनिटचा वापर केला जात आहे. ११ हजार ५४ उमेदवार या निवडणुकीत नशीब अजमावत असून त्यात ५ हजार ५५७ महिला उमेदवार आहेत. निवडणुकीसाठी ४ हजाराहून अधिक पोलीस तैनात आहेत.