ममता बॅनर्जी (Mamata Banerjee leg fracture) आणि भाजपाला यंदाची पश्चिम बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची असतानाच ममता मोठ्या पेचात सापडल्या आहेत. निवडणूक पूर्व सर्व्हेमध्ये तृणमूलच्या बाजुने कल दिसत असताना बुधवारी ममतांवर झालेल्या कथित हल्ल्यामुळे ममता यांचा पक्ष पिछाडीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Doctor suggest to take rest for one and half month for Mamata Banerjee in Bengal Assembly Election days.)
ममता यांच्या दुखापतीची एक्सरे आणि एमआरआयद्वारे तपासणी करण्यात आली. यामध्ये च्या उजव्या खांद्याला, मानेला दुय़खापत झाल्याचे एमआरआय स्कॅनमध्ये समोर आले आहे. तर डाव्या पायाच्या टाचेला फ्रॅक्चर झाल्याने प्लॅस्टर घालण्यात आले आहे. ममता या जायबंदी झाल्या असल्याने त्यांना डॉक्टरांनी पुढील दीड महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे ममता यांच्या प्रचारसभांना मोठ्या प्रमाणावर ब्रेक लागण्याची चिन्हे आहेत.
ममता यांच्या पायाला फ्रॅक्चर असल्याने त्या तृणमूल काँग्रेसच्या प्रचारसभांना प्रत्यक्ष जाऊ शकणार नाहीत. मुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रमुख असल्याने त्यांच्याशिवाय विजय खेचून आणणे सध्याच्या परिस्थितीत तृणमूलच्या नेत्यांना जमणारे नाही. भाजपाने गेल्या काही महिन्यांपासून तृणमूलला चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली असून अनेक नेते, आमदारही गळाला लावले आहेत. यामुळे ममतांचे प्रत्यक्ष सभांना, प्रचाराला असणे आणि जरी डिजिटली त्यांनी संबोधित केले तरी त्याचा परिणाम कमीच असणार आहे.
नंदीग्राममध्ये नेमके काय घडले?ममता यांना दुखापत झाली हे खरे असले तरी देखील ममता यांच्या कारजवळ उभ्या असलेल्या प्रत्यक्षदर्शी कार्यकर्त्याने असे काही घडलेच नसल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ममता यांच्या पक्षाने तिथे 4-5 समाजकंटक होते. त्यांनीच ममता गाडीत बसत असताना दरवाजा ढकलल्याचा आरोप केला आहे. मात्र, चित्तरंजन दास नावाच्या तरुणाने तेथील घडलेला प्रकार सांगितला आहे. दासने सांगितले की, मी घटनास्थळी होतो. मुख्यमंत्री त्यांच्या कारमध्ये बसलेल्या होत्या. पण दरवाजा उघडा होता. हा दरवाजा एका पोस्टरला आपटला आणि बंद झाला. कोणीही त्यांच्या कारचा दरवाजा ढकललेला नाही. दरवाजाकडे कोणीही उभे नव्हते.
तर आणखी एक प्रत्यक्षदर्शी असलेली विद्यार्थीनी सुमन हिने सांगितले की, ममता यांना पाहण्यासाठी लोक जमा झाले होते. सर्वजण त्यांना घेरून उभे होते. त्याचवेळी त्यांच्या मानेला दुखापत झाली. कोणी धक्का दिला नाही, त्यांची गाडी हळू हळू पुढे जात होती. या दोघांचे म्हणणे खरे मानले तर तृणमूलला या अपघाताचा किंवा हल्ल्याचा फायदा होण्याची शक्यता कमी दिसत आहे.
निवडणूक कधी?
पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक आठ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. पहिला टप्पा - 27 मार्च रोजी मतदान, दुसरा टप्पा - 1 एप्रिल, तिसरा टप्पा - 6 एप्रिल, चौथा टप्पा - 10 एप्रिल, पाचवा टप्पा - 17 एप्रिल, सहावा टप्पा- 26 एप्रिल, सातवा टप्पा- २६ एप्रिल, आठवा टप्पा- २९ एप्रिल मतदान होईल. त्यानंतर, 2 मे रोजी निकाल जाहीर होईल. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत