कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे उमेदवार पार्थ पवार यांनी सोमवारी उरण परिसरात झंझावाती दौरा केला. मात्र हा दौरा करत असतानाच न्हावे गावात जात असताना रस्त्यात ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक तरु ण गंभीर जखमी झाला होता. त्या गंभीर जखमी तरुणाला कोणतीच मदत रस्त्यावर उपलब्ध होत नव्हती. पार्थ पवार यांचा ताफा न्हावे गावात जात होता. मात्र अपघातग्रस्त तरु ण दिसताच पार्थ पवार यांनी आपला ताफा थांबवला. जखमी तरु णाच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याचे लक्षात येताच त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. तत्काळ गाडी उपलब्ध करून देत जखमी तरुणाला वैद्यकीय मदत मिळवून दिली. ट्रक चालकाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नियोजित कार्यक्र माला महत्त्व न देता पार्थ पवार यांनी माणुसकीचे दर्शन यानिमित्ताने घडवले. त्यामुळे परिसरात पार्थ पवार यांच्या माणुसकीचे कौतुक होत आहेत.प्रचार आणि गाठीभेटी या होतच राहतील, मात्र गंभीर जखमी झालेल्या तरु णाचे प्राण वाचवणे हीच माणुसकी असल्याची चर्चा परिसरात होत आहे. निवडणूक होईपर्यंत प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो, मात्र लोकप्रतिनिधीच्या माणुसकीचे दर्शन अशाच काही प्रसंगातून घडत असते. भर उन्हात गंभीर तरु णाला मदतीचा हात देऊन सर्वच तरु णांसमोर पार्थ यांनी आदर्श निर्माण केला आहे.
प्रचारादरम्यान पवारांच्या माणुसकीचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 12:24 AM