नवी दिल्ली:संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस अधिवेशनाची कार्यवाही सुरळीत पार पडू शकली नाही. अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधक पेगासस हेरगिरी, कृषी कायदे, बेरोजगारी, कोरोना या मुद्द्यांवरुन संसदेत गदारोळ घातल आहेत. यामुळे आता लोकसभेची कार्यवाही अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधक आणि सरकारमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. संसदेची कार्यवाहीबद्दल बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, सभागृहात अपेक्षेप्रमाणे कार्यवाही झाली नाही. फक्त 22 टक्के काम झालंय. अधिवेशनात आतापर्यंत संविधानाच्या 127 व्या सुधारणा विधेयकासह एकूण 20 विधेयके मंजूर करण्यात आली. 66 प्रश्नांची तोंडी उत्तरे देण्यात आली. सदस्यांनी नियम 377 अंतर्गत 331 बाबी मांडल्या.
अध्यक्षांच्या खुर्चीवर फाइल फेकने लाजीरवाणेकेंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनीही यावेळी विरोधकांनी जोरदार निशणा साधला. या पक्षाला दोन वर्षांपासून आपला अध्यक्ष निवडता येत नाही. यांचे खासदार आपल्याच सरकारचे विधेयक फाडतात. रस्त्यावरही जे काम करायला लाज वाटेल, ते काम यांनी संसदेत केलं. लोकशाहीला लाजवेल, असे कृत्य यांनी केलंय. लाखो रुपये खर्च करुन अधिवेशन भरवलं जातं. हे लोक जनतेचे प्रश्न मांडण्याऐवजी गोंधळ करुन संसदेतून निघून जातात. काल राज्यसभेत आधी कागद फाडले, नंतर अध्यक्षांच्या खुर्चीवर फाइल फेकली, हे लाजीरवाणे आहे, अशा शब्दात अनुराग ठाकुर यांनी विरोधकांवर टीका केली.