नरेंद्र मोदींच्या 'या' चुकांचे परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागणार - काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2020 06:55 PM2020-08-13T18:55:57+5:302020-08-13T19:00:02+5:30
सत्यजीत तांबेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने हाती घेतलेल्या ‘कहां गये वो २० लाख करोड?’ या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी बेरोजगार युवकांशी संवाद साधण्यात आला.
मुंबई: करोनाचे संकट येण्याअगोदरच नोटबंदीसारख्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यात आता लॉकडाऊनमुळे ज्यांना रोजगार होता अशा १२ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या असून अतिशय गंभीर परिस्थिती झाली आहे. अर्थव्यवस्था आणि लोकांच्या एकूणच जगण्यावर झालेले हे दुष्परिणाम दोन-चार वर्षांपुरते मर्यादित नसून येणाऱ्या अनेक पिढ्यांना ते भोगावे लागणार आहेत. अर्थव्यवस्था हाताळताना केलेल्या या चुकांसाठी पुढच्या १०० पिढ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफ करणार नाहीत, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.
सत्यजीत तांबेंच्या संकल्पनेतून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने हाती घेतलेल्या ‘कहां गये वो २० लाख करोड?’ या उपक्रमाच्या चौथ्या दिवशी बेरोजगार युवकांशी संवाद साधण्यात आला. केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून त्यांना काय मदत मिळाली हे विचारण्यात आलं. जिल्हा व तालुका पातळीवर बेरोजगार युवकांशी साधलेल्या संवादातून रोजगाराची गंभीर स्थिती समोर आली आहे. गेलेल्या नोकऱ्या परत मिळत नाहीत.
12 करोड लोक लॉकडाऊनच्या काळात बेरोजगार झाले असून त्यांची रोजची गुजराण मुश्किल झाली आहे. पंतप्रधान मोदी हे समजून घ्यायलाच तयार नाहीत.
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) August 13, 2020
मोदी नुसती भाषणे आणि मोठंमोठे आकडे तोंडावर फेकतात. 20 लाख कोटीपैकी प्रत्यक्षात कुणालाच काही मदत आली नाही.#कहाँ_गए_वो_२०_लाख_करोड़ ?? pic.twitter.com/NTV7qNPiK0
लॉकडाउन संपला तरी खर्चाला कात्री लावण्यासाठी कंपन्या कामावरून काढत आहेत. जगायचं कसं हा प्रश्न आहे, अशी हतबलता युवकांनी व्यक्त केली. तर 'पैसे सोडा, नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांच्या जेवणाची सोय केल्याचं मोदींनी सांगितलं होतं. मात्र, आमच्या गावात तर कुणालाच नाही भेटली ही मदत' अशी सद्यस्थिती असल्याचे काहींनी सांगितले. मोदींनी घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजबद्दल तरुणांमध्ये नाराजी आणि मोदींकडून भ्रमनिरास झाल्याची भावना प्रकर्षाने दिसली.
दरम्यान, उद्या युवक काँग्रेसचे पदाधिकारी भाजपा पदाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांनाच ‘कहां गये वो 20 लाख करोड?’ हा जाब विचारणार आहेत.
आणखी बातम्या...
CoronaVirus News : नवनीत राणा नागपूरहून मुंबईला रवाना, पुढील उपचार लीलावती रुग्णालयात होणार
महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही, सर्व पूल भक्कम - संजय राऊत
शरद पवार कुटुंबप्रमुख, प्रत्येकाला सूचना करण्याचा अधिकार; पार्थ प्रकरणावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
‘मीच फक्त मॅच्युअर’ असा माझा दावा नाही - शौमिका महाडिक; शरद पवार यांच्या विधानावर टीका