शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

...तर दिल्लीची गादी हस्तगत करू; जानकरांनी थेट शरद पवारांसमोरच मांडला 'लोकसभे'चा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 7:46 PM

Ahilyadevi Holkar Statue on Jejuri fort : राष्ट्रवादीचे आमदार आणि पवार साहेबांचे नातू रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले तिथेच माझ्या पक्षाची स्थापना झाली. सांगण्याचा उद्देश असा की, आम्ही धनगर चळवळीतून पुढे आलो आहोत, असे महादेव जानकर म्हणाले.

पुणे : जेजुरी गडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण झाले. या सोहळ्याआधी आलेले इंदौरच्या होळकर राजघराण्याचे पत्र, भाजपाच्या नेत्यांनी घातलेला गोंधळ यामुळे वातावरण तापलेले होते. यातच आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांसमोर (Sharad Pawar) राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट दिल्लीच्या तख्ताचे समीकरण मांडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Maratha and Holkar people can win Delhi in Loksabha, Mahadev Jankar to Sharad pawar)

राष्ट्रवादीचे आमदार आणि पवार साहेबांचे नातू रोहित पवार ज्या मतदारसंघातून निवडून आले तिथेच माझ्या पक्षाची स्थापना झाली. सांगण्याचा उद्देश असा की, आम्ही धनगर चळवळीतून पुढे आलो आहोत. त्याच भूमीत अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला, असे जानकर म्हणाले. या कार्यक्रमाला होळकर घराण्याचे वंशज आणि छत्रपती संभाजीराजे भोसले हेदेखील उपस्थित होते.

मराठा आणि होळकर समाजाची शिवरायांनी सोयरिकीची मोट बांधली होती. याचा आधार घेत जानकरांनी जाणत्या पवारांना दिल्लीची गादी हस्तगत कशी करता येईल, याबाबत सांगितले. आमचा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (NDA) असला तरी शरद पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. धनगर समाजाला अनुसूचित जातींच्या (ST) सवलती मिळण्यासाठी शरद पवार यांनी आशीर्वाद द्यावेत. मराठा आणि धनगर समाज एकत्र आला तर आपण दिल्लीची गादी हस्तगत करु शकतो, असे जानकर म्हणाले. 

टॅग्स :Mahadev Jankarमहादेव जानकरSharad Pawarशरद पवारJejuriजेजुरीmarathaमराठाDhangar Reservationधनगर आरक्षण