हिंदू अवतारामागे ममतांचे मतांचे गणित; पुरुलियात व्हीलचेअरवरून प्रचारसभा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:54 AM2021-03-16T04:54:35+5:302021-03-16T06:54:23+5:30

ममतादीदींच्या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांचे दोन हेतू मानले जातात. पहिला मुस्लीम लांगुलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने अधिक हिंदू लोकसंख्या असलेला टापू. गेल्या दोन निवडणुकींत ममता बॅनर्जी यांचा हा बालेकिल्ला राहिला आहे.

The mathematics of Mamata's votes behind the Hindu incarnation; Wheelchair campaign in Purulia | हिंदू अवतारामागे ममतांचे मतांचे गणित; पुरुलियात व्हीलचेअरवरून प्रचारसभा

हिंदू अवतारामागे ममतांचे मतांचे गणित; पुरुलियात व्हीलचेअरवरून प्रचारसभा

googlenewsNext

कोलकाता : नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तेरा मंदिरांना भेटी आणि जाहीर सभेत मतदारांना देवीपाठ ऐकविणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुरुलिया येथे व्हीलचेअरवरून प्रचारसभा घेताना भाजपच्या हिंदुत्वाची खिल्ली उडविली. (The mathematics of Mamata's votes behind the Hindu incarnation; Wheelchair campaign in Purulia)

ममतादीदींच्या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांचे दोन हेतू मानले जातात. पहिला मुस्लीम लांगुलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने अधिक हिंदू लोकसंख्या असलेला टापू. गेल्या दोन निवडणुकींत ममता बॅनर्जी यांचा हा बालेकिल्ला राहिला आहे.

नंदीग्राम येथे गर्दीत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांना पुरुलियाच्या सभेत भाजपच्या रथयात्रेची खिल्ली उडविताना जगन्नाथांच्या रथाची आठवण झाली. आपणही भाजप नेत्यांइतकेच हिंदू आहोत, हे दाखविण्याचा हा प्रयत्न होता.

तृणमूलचा बालेकिल्ला
- विधानसभेच्या २९४ पैकी १६७ जागा नादिया, पूर्व व पश्चिम वर्धमान, हुगळी, उत्तर व दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर, हावडा व कोलकाता या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दक्षिण बंगालमध्ये आहेत. जंगलमहल प्रदेश मिळून दक्षिणेकडे दोनशे विधानसभा मतदारसंघ आहेत. 

- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलने पीछेहाट होऊनही १६४ विधानसभा जागांवर आघाडी मिळविली. त्यापैकी दक्षिण बंगालमधील जागा ११९ होत्या.

- भाजपचे गेल्या निवडणुकीत अठरा खासदार विजयी झाले आणि १२१ विधानसभा जागांवर आघाडी मिळाली.  तो भाग उत्तर बंगाल, दार्जिलिंग टेकड्या व जंगलमहलमधील आहे. येथील ९४ पैकी ६७ जागी भाजपला आघाडी होती.

- मध्य बंगालमध्ये मुस्लीम मतदार ५६ टक्के आहेत. दक्षिण बंगालमधील मुस्लीम मतदारांचे प्रमाण २४ टक्के इतकेच आहे. त्यामुळेच या भागात ममता यांनी हिंदू अवतार धारण केल्याचे दिसत आहे.
 

Web Title: The mathematics of Mamata's votes behind the Hindu incarnation; Wheelchair campaign in Purulia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.