शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

हिंदू अवतारामागे ममतांचे मतांचे गणित; पुरुलियात व्हीलचेअरवरून प्रचारसभा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 4:54 AM

ममतादीदींच्या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांचे दोन हेतू मानले जातात. पहिला मुस्लीम लांगुलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने अधिक हिंदू लोकसंख्या असलेला टापू. गेल्या दोन निवडणुकींत ममता बॅनर्जी यांचा हा बालेकिल्ला राहिला आहे.

कोलकाता : नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी तेरा मंदिरांना भेटी आणि जाहीर सभेत मतदारांना देवीपाठ ऐकविणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी सोमवारी पुरुलिया येथे व्हीलचेअरवरून प्रचारसभा घेताना भाजपच्या हिंदुत्वाची खिल्ली उडविली. (The mathematics of Mamata's votes behind the Hindu incarnation; Wheelchair campaign in Purulia)

ममतादीदींच्या हिंदूंना चुचकारण्याच्या प्रयत्नांचे दोन हेतू मानले जातात. पहिला मुस्लीम लांगुलचालनाचा ठपका दूर करणे आणि दुसरा दक्षिण बंगालमधील हिंदू मतांवरील प्रभाव कायम ठेवणे. दक्षिण बंगाल हा तुलनेने अधिक हिंदू लोकसंख्या असलेला टापू. गेल्या दोन निवडणुकींत ममता बॅनर्जी यांचा हा बालेकिल्ला राहिला आहे.

नंदीग्राम येथे गर्दीत धक्काबुक्कीत जखमी झालेल्या ममता बॅनर्जी यांना पुरुलियाच्या सभेत भाजपच्या रथयात्रेची खिल्ली उडविताना जगन्नाथांच्या रथाची आठवण झाली. आपणही भाजप नेत्यांइतकेच हिंदू आहोत, हे दाखविण्याचा हा प्रयत्न होता.

तृणमूलचा बालेकिल्ला- विधानसभेच्या २९४ पैकी १६७ जागा नादिया, पूर्व व पश्चिम वर्धमान, हुगळी, उत्तर व दक्षिण २४ परगणा, पूर्व मेदिनीपूर, हावडा व कोलकाता या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या दक्षिण बंगालमध्ये आहेत. जंगलमहल प्रदेश मिळून दक्षिणेकडे दोनशे विधानसभा मतदारसंघ आहेत. 

- २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूलने पीछेहाट होऊनही १६४ विधानसभा जागांवर आघाडी मिळविली. त्यापैकी दक्षिण बंगालमधील जागा ११९ होत्या.

- भाजपचे गेल्या निवडणुकीत अठरा खासदार विजयी झाले आणि १२१ विधानसभा जागांवर आघाडी मिळाली.  तो भाग उत्तर बंगाल, दार्जिलिंग टेकड्या व जंगलमहलमधील आहे. येथील ९४ पैकी ६७ जागी भाजपला आघाडी होती.

- मध्य बंगालमध्ये मुस्लीम मतदार ५६ टक्के आहेत. दक्षिण बंगालमधील मुस्लीम मतदारांचे प्रमाण २४ टक्के इतकेच आहे. त्यामुळेच या भागात ममता यांनी हिंदू अवतार धारण केल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ElectionनिवडणूकMamata Banerjeeममता बॅनर्जीtmcठाणे महापालिकाBJPभाजपा