शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

मावळ लोकसभा मतदारसंघात चुरशीची लढत अपेक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 11:20 PM

मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल २0१९ रोजी मतदान होणार आहे.

- विजय मांडे कर्जत : लोकसभा निवडणूक जाहीर झाली असून, लगोलग आचारसंहिताही लागू झाली. मावळ मतदारसंघात चौथ्या टप्प्यात म्हणजे २९ एप्रिल २0१९ रोजी मतदान होणार आहे. मावळ मतदारसंघातून गेल्यावेळी आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारी दिली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे उमेदवारीसाठी पुढे करून चाचपणी करण्यात येत आहे.पूर्वी रायगड लोकसभा मतदारसंघ होता. बॅ. ए. आर. अंतुले हे सातत्याने निवडून येत होते. त्या वेळी हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. १९९९ मध्ये काँग्रेस पक्ष फुटला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झाला. त्या वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्यात आली होती. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने शेतकरी कामगार पक्षाशी आघाडी केली होती.२००४ मध्ये काँग्रेस आघाडीचे बॅ. ए. आर. अंतुले शेतकरी कामगार पक्षाच्या विवेक पाटील यांचा पराभव करून निवडून आले. २००९ मध्ये लोकसभा मतदारसंघाची नव्याने रचना झाली आणि मावळ आणि रायगड मतदारसंघ निर्माण झाला. मावळमध्ये कर्जत, उरण आणि पनवेलमधील तीन विधानसभा मतदारसंघ तसेच पुणे जिल्ह्यातील मावळ, पिंपरी, चिंचवड असे तीन विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघ निर्माण झाला. मावळ मतदारसंघाची पहिली निवडणूक आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे आणि युतीतील शिवसेनेचे गजानन बाबर यांच्यामध्ये झाली. त्यात बाबर यांनी बाजी मारली.गेल्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना - भाजपा युतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे शिवसेनेतून आलेल्या राहुल नार्वेकर यांच्यामध्ये लढत झाली. यात बारणे निवडून आले. त्यांनी पहिल्यांदाच संसदेत प्रवेश केला आणि उत्तम काम करून पाचही वर्ष संसदरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले, तर पराभूत झालेले नार्वेकर विधानपरिषदेचे आमदार झाले.यंदा मावळ मतदारसंघाची जागा भाजपाला मिळावी असे प्रयत्न सुरू आहेत. खासदार बारणे यांनी पाचही वर्ष संसदरत्न पुरस्कार मिळविला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत, दांडगा लोकसंग्रह, निधीचे नियोजन आणि अगदी तळागाळात, दुर्गम भागात जाऊन काम करण्याचे तंत्र यामुळे हा मतदारसंघ शिवसेना सहजासहजी सोडेल की नाही? हे सांगता येत नाही.गेल्यावेळी शेतकरी कामगार पक्षाने स्वतंत्र निवडणूक लढवित लक्ष्मण जगताप यांनी सुमारे साडेतीन लाख मते मिळवून आपली चुणूक दाखविली होती. मात्र,यंदा शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत सामील झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा एखादा तगडा उमेदवार दिल्यास मतदारसंघाचे चित्र बदलेल असे वाटते. त्यामुळे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार आणि आर. आर. पाटील यांची कन्या स्मिता पाटील यांची नावे चर्चेत आली होती. खुद्द स्मिता पाटील यांनी उमेदवारी लढणार नाही, असे सांगितले. त्यामुळे पार्थ पवार यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे. तसे झाले तर पवार आणि बारणे यांच्यामधील लढत रंगतदार होईल हे नक्की.कर्जत नगरपरिषदेमध्ये २५ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातून युतीने सत्ता मिळवली. माथेरान गिरीस्थान नगरपरिषदसुद्धा शिवसेनेच्या ताब्यात आह. नुकत्याच झालेल्या तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत तब्बल सहा ग्रामपंचायतींचे थेट सरपंच शिवसेनेचे निवडून आले आहेत, तर उरण नगरपरिषदेवर सेनेची सत्ता आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा