नारायण बडगुजरपिंपरी : मावळ लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. पिंपरी विधानसभा हा राखीव मतदारसंघ आहे. कोणतीही मोठी सभा येथे घेण्याऐवजी उमेदवारांनी थेट संवादावर भर दिला आहे. महायुती, महाआघाडीसह वंचित बहुजन आघाडीकडेही येथील मतदारांचे लक्ष आहे. झोपडपट्टीबहुल भाग असला, तरी प्राधिकरणासह काही भाग नव्याने विकसित झाला असल्याने हा मतदारसंघ संमिश्र आहे. त्यामुळे २००९ मध्ये राष्ट्रवादी, तर २०१४ मध्ये शिवसेनेचा विजय झाला. पिंपरी विधानसभा मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघात समावेश आहे. महायुतीतर्फे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यानंतर बारणे आणि भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांच्यात दिलजमाईसाठी बराच कालावधी गेला. मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी या काळात राष्ट्रवादीतून भाजपत गेलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर बारणे यांनीही वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. वंचित बहुजन आघाडीबाबतही येथील मतदारांत उत्सुकता आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात सुमारे सहा लाख दलित व मुस्लिम मते आहेत. त्यातील सुमारे दीड लाख मते पिंपरी विधानसभा मतदारसंघात आहेत. ...............युती । प्लस पॉइंट काय आहेत?मतदारसंघात शिवसेनेसह भाजपा आणि आरपीआयनेही (आठवले गट) प्रचारासाठी यंत्रणा कामाला लावली आहे़ मतदारसंघात आमदार शिवसेनेचा आहे. त्यांच्याकडून आणि भाजपा नगरसेवकांकडून कोपरा सभांवर भर देण्यात येत आहे........................युती । वीक पॉइंट काय आहेत?मतदारसंघ संमिश्र स्वरूपाचा आहे. त्यातच शिवसेनेचे केवळ चारच नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे सर्वच स्तरातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. त्यासाठी त्यांची भाजपावर मदार आहे. ....................आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?
पिंपरी विधानसभेतून पहिला आमदार राष्ट्रवादीचा झाला होता. तसेच राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले बडे पदाधिकारी या मतदारसंघात आहेत. त्यांना महाआघाडीने गळ घातली आहे. महाआघाडीचे एकदिलाने काम सुरू आहे................आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?विधानसभेचा हा मतदारसंघ आरक्षित असल्याने येथे मागासवर्गीय मतदारांची संख्या जास्त आहे. या मतदारांचे वंचित बहुजन आघाडी आणि महाआघाडीमध्ये मोठे विभाजन होऊ शकते. त्याचा फटका महाआघाडीला बसू शकतो. .................. मागच्या निवडणुकीत़़़२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या गौतम चाबुकस्वार यांनी ५१,०९६ मते मिळवीत राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे (४८,७६१ मते) यांचा पराभव केला होता़...............मागच्या दोन लोकसभांमध्ये काय होता निकाल?2009च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला ५७,२८९, राष्ट्रवादीला ५२,५०१ तर बसपाला ५०३३ मते मिळाली होती. अपक्ष मारुती भापकर यांना ३९५० मते मिळाली होती. ४७८८ मताधिक्य शिवसेनेला होते.....................2014च्या लोकसभा निवडणुकीत या विधानसभेतून शिवसेनेला ९५,८८९ मते मिळाली होती, तर शेकापला ३८,३५९ मते होती. तिसºया क्रमांकावर असलेल्या राष्ट्रवादीला २१,०७१ मते मिळाली होती.विधानसभेचा हा मतदारसंघ २००९ मध्ये अस्तित्वात आला. २००९ मध्ये राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी झाले होते.
पिंपरी विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्यापुरुष - 1,79,808महिला - 1,61,889तृतीयपंथी - 4
एकूण - 3,41,701
रील्ल३ ा१ङ्मे े८ ्रढंि