Nusrata Jahan nikhil jain marriage issue: प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूलच्या खासदारनुसरत जहाँ (Nusarat jahan) उद्योगपती निखिल जैनसोबत ( Nikhil jain) लग्नच मान्य नसल्याचे सांगून वादात अडकली आहे. प्रेग्नंट असलेल्या नुसरत समोर आता नवीन अडचणी उभ्या राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नुसरत जहाँचीखासदारकी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपा नेते अमित मालवीय यांनी यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Nusarat jahan take oath in Parliament name of ruhi jain, now says invalid marriage with Nikhil jain.)
अमित मालवीय हे भाजपाचे आय़टी सेल प्रमुख आहेत. त्यांनी नुसरत जहाँच्या निखिल जैनसोबत लग्न मान्य नसल्याच्या वक्तव्यावर ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. तृणमूल खासदार नुसरत जहाँ रुही जैन यांचे हे खासगी आयुष्य आहे. त्या कोणासोबत लग्न करतात, कोणासोबत राहतात याच्याशी कोणाचा काही संबंध असता नये. परंतू त्या एक लोकप्रतिनिधी आहेत. मग अशावेळी भर संसदेत नुसरत जहाँ यांनी निखिल जैनसोबत लग्न केल्याची घोषणा केली होती. हे संसदेच्या रेकॉर्डवर आले आहे. आता त्या लग्न नाकारत आहेत. मग त्या संसदेत खोटे बोलल्या का? असा सवाल उपस्थित केला आहे.
नुसरत जहाँ यांनी संसदेत शपथ घेण्याआधी हे लग्न केले होते. यानंतर त्या सपथ घेत असताना सलाम वालेकुम नमस्कार असे म्हणत मी, नुसरता जहाँ रुही जैन....अशी शपथ घेतली होती.
तुर्कस्तानचा आसरा...नुसरत जहाँ हिने या प्रकरणी पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ती म्हणाली की, परदेशी भूमी असल्याने तुर्की मॅरेज रेग्युलेशननुसार आमचा विवाह अवैध आहे. त्याशिवाय हा एक Interfaith Marriage (दोन भिन्न धर्मीय व्यक्तींमधील विवाह) असल्याने त्याला भारतात कायदेशीर मान्यता मिळवण्याची आवश्यकता होती. मात्र तसे झाले नाही. कायदेशीररीत्या हा विवाह वैध नाही आहे. तर हे केवळ एक नाते किंवा लिव्ह इन रिलेशनशिप आहे. त्यामुळे त्यातून बाजूला होण्यासाठी घटस्फोट घेण्याची गरजच नाही, असे तिचे म्हणणे आहे.