राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु; धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 01:20 PM2021-01-14T13:20:06+5:302021-01-14T13:21:32+5:30
Dhananjay Munde News: धनंजय मुंडे हे आज पहाटे कोणताही ताफा, सुरक्षा न घेता खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले. आता ते काही दिवस तिथूनच काम पाहणार असल्याचे समजते. तर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. आता पवार काय निर्णय घेतात, यावर मुंडेंचे राजकारण अवलंबून असल्याचे समजते.
मुंबई : महिलेसोबत असलेले नाजूक संबंध, तिच्या बहिणीने केलेले बलात्काराचे आरोप आणि महिलेपासून असलेल्या दोन मुलांचा स्वीकार या विषयावरून गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडविणाऱ्य़ा धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादीने भूमिका स्पष्ट केली आहे. तरीही आज राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु झाली असून यामध्ये धनंजय मुंडेंबाबत निर्णय की चर्चा होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे प्रकरणावर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचे सांगत अधिक बोलण्यास नकार दिला आहे. आता सुरु झालेल्या राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, प्रफुल पटेल उपस्थित आहेत. तर धनंजय मुंडे हे आज पहाटे कोणताही ताफा, सुरक्षा न घेता खासगी गाडीतून चित्रकुट बंगल्यावर दाखल झाले. आता ते काही दिवस तिथूनच काम पाहणार असल्याचे समजते. तर मुंडेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे. आता पवार काय निर्णय घेतात, यावर मुंडेंचे राजकारण अवलंबून असल्याचे समजते.
आमदारकी रद्द होणार का? कायदेतज्ज्ञांना वाटतं...
जयंत पाटील काय म्हणाले...
एकीकडे विरोधक जरी आक्रमक झाले असताना धनंजय मुंडे यांनी बुधवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्वतंत्रपणे भेट घेत त्यांची बाजू मांडली. तसेच धनंजय मुंडे मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीस मुंडे उपस्थित होते. मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबाबत धनंजय मुंडे द्विधा मन:स्थितीत असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. शेवटी, शरद पवार त्यांना काय आदेश देतात, यावरच सगळे अवलंबून असेल, असे मानले जाते. मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळली आहे.
जयंत पाटील धनंजय मुंडे प्रकरणाबाबत म्हणाले की, राजकीय आयुष्यामध्ये एका विशिष्ट टप्प्यावर पोहोचण्यासाठी बराच संघर्ष करावा लागतो. अशावेळी कोणी काही आरोप करत असेल तर त्याची आधी चौकशी होणे आवश्यक आहे. सत्यता न पडताळता निष्कर्षावर येणे योग्य नाही, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.