श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीला जम्मू-काश्मीरमधील १४ पक्षांचे नेते उपस्थित होते. या सर्वपक्षीय बैठकीत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. असे असले तरी माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह मेहबुबा मुफ्ती आणि अन्य नेते जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अनुच्छेद ३७० लागू करून विशेष राज्याचा दर्जा कायम करावा, या मागणीवर ठाम आहेत. यातच आता जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी, जोपर्यंत जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा मिळत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुका लढवणार नसल्याची घोषणा केली आहे. (mehbooba mufti says will not contest polls until jammu and kashmir special status is restored)
जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद ३७० हटवल्यापासून लोकशाही व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यातच पीडीपी पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा पुन्हा मिळत नाही, तोपर्यंत निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी बर्याच वेळा हे स्पष्ट केले आहे की केंद्रशासित प्रदेशांतर्गत मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. मात्र, याचा अर्थ आम्ही निवडणूक लढवणार नसल्यामुळे निर्माण होणारी पोकळी कोणीही भरून काढू शकत नाही. राजकारणात टिकून राहून अस्तित्व दाखवण्यासाठी आम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवल्या, असेही मेहबुबा मुफ्ती यांनी यावेळी स्पष्ट केले.
मेहबुबा मुफ्तींचे PM मोदींच्या बैठकीत वेगळेच ‘रागरंग’; पाकिस्तानचे नावही घेतले नाही!
तो निर्णय मागे घ्यावा
५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्राने घेतलेला निर्णय मागे घेतलाच पाहिजे. जम्मू-काश्मीरमधील दडपशाहीचे युग संपले पाहिजे, या मागणीचा पुनरुच्चार मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. दुसरीकडे, कलम ३७० हटवल्यास जम्मू-काश्मीरमध्ये कोणीही तिरंगा हातात घेणार नाही, असा दावा करणाऱ्या मेहबुबा मुफ्ती त्याच तिरंगा ध्वजाच्या समोर बसून पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली. एका वृत्तपत्रानुसार, पंतप्रधान मोदींसोबतच्या बैठकीत फुटीरतावादी आणि पाकिस्तानशी चर्चेबाबत मेहबुबा मुफ्ती यांनी अवाक्षरही काढले नाही. मात्र, या बैठकीपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये माध्यमांशी बोलताना, जम्मू-काश्मीरच्या नेत्यांची चर्चा करत असताना पाकिस्तानशी चर्चा करण्याचा आग्रह मेहबुबा मुफ्ती यांनी धरला होता.
नरेंद्र मोदी PM आहेत, BJP नेतेही; जमीन घोटाळा झालाच कसा? अयोध्येतील साधुंचा सवाल
दरम्यान, राजकीय मतभेद असतील. मात्र, राष्ट्र हितासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करायला हवे. जेणेकरून जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना फायदा होईल. जम्मू आणि काश्मीरमध्ये सर्वांसाठीच सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करायचे आहे. एवढेच नाही, तर, दिल्ली और दिल की दूरी खत्म करना चाहता हूं, असे पंतप्रधान मोदी या बैठकीनंतर म्हणाले. अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सुमारे ६८३ दिवसांनंतर पंतप्रधान मोदी जम्मू-काश्मीरच्या नेत्यांशी संवाद साधला.