लाेकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : भाजप नेते किरीट साेमय्या (Kirit Somaiya) यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर शिवसेनेचे सचिव आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचा दापाेली तालुक्यातील मुरूड येथे बांधलेला आलिशान बंगला रविवारी जमीनदाेस्त करण्यात आला. मिलिंद नार्वेकर यांनी स्वत:हून या बंगल्याचे बांधकाम बुलडाेझर लावून ताेडून टाकले. (Shivsena Leader, CM Uddhav Thackeray's PA Milind Narvekar demolished his bungalow in Dapoli .)
दापाेली तालुक्यातील मुरूड येथील समुद्रकिनारी मिलिंद नार्वेकर यांनी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून आलिशान बंगला बांधल्याचा आराेप भाजप नेते किरीट साेमय्या यांनी केली हाेता. त्यासाठी विविध पातळ्यांवर सातत्याने पाठपुरावा करून जिल्हा प्रशासनापासून ते केंद्र सरकारपर्यंत तक्रारही दाखल करण्यात आली हाेती.
दापाेलीत येऊन पाहणी करणार : साेमय्यामिलिंद नार्वेकर यांनी स्वत:हून हा बंगला पाडल्याची माहिती किरीट साेमय्या यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामध्ये त्यांनी अखेर अनधिकृत असलेला हा बंगला मिलिंद नार्वेकर यांना पाडावा लागल्याचे म्हटले आहे. हा बंगला पाहण्यासाठी आपण स्वत: दापाेलीला जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
५००० स्क्वेअर फुटांमध्ये बंगलामुरूड येथील समुद्रकिनारी हा बंगला बांधण्यात आला हाेता. समुद्रकिनाऱ्याजवळील ७२ गुंठे जागेत ५०० स्क्वेअर फुटांमध्ये बंगल्याचे बांधकाम सुरू केले हाेते. हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा दावा किरीट साेमय्या यांनी केला हाेता.या प्रकरणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल येथे खटला सुरू हाेता. जिल्हा किनारा मॅनेजमेंट कमिटी आणि महाराष्ट्र काेस्टल झाेन ऑथाॅरिटीकडून नाेटीसही बजावण्यात आली हाेती. मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक असल्याने त्यांच्यावर कारवाई हाेणार की अभय मिळणार, याकडे लक्ष लागले हाेते.