ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. कोलकातामध्ये त्यांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं. भाजपचं सदस्यत्व स्वीकारल्यानंतर ते आक्रमक भूमिकेत दिसून आले. "मी एक नंबरचा कोब्रा आहे... एक दंश जरी झाला तरी तुम्ही फोटो बनून जाल," असं मिथुन चक्रवर्ती म्हणाले. ते कोलकाता येथे पार पडलेल्या ब्रिगेड ग्राऊंड येथील रॅलीत उपस्थित होते. यापूर्वी मिथुन चक्रवर्ती हे तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर गेले होते. पश्चिम बंगालमध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग आहे. "मी बंगाली आहे त्याचा मला अभिमान आहे. मला माहितीये की तुम्हाला माझे डायलॉग्ज आवडतात," असंही मिथुन चक्रवर्ती यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या चित्रपटातील एका डायलॉगदेखील म्हटला. "हे सर्व पाहून आपल्याला आपलं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटत आहे. मी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानांसह मंचावर उभा राहणार आहे. हे खरंच स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे," असंते म्हणाले.
विकासासाठी २४ तास मेहनत करू"मी या ठिकाणी परिवर्तानाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालच्या विकासाचा विश्वास घेऊन आलो आहे. बंगालमध्ये बदल घडवण्याचा, गुंतवणूक वाढवण्याचा, पुनर्निर्माणाचा विश्वास देण्यासाठी मी आलो आहे. या ठिकाणी तरूण, शेतकरी, उद्योजक, माता-भगिनी यांच्या विकासासाठी आम्ही २४ तास दिवसरात्र मेहनतीनं काम करु. आम्ही मेहनत करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही." असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.