शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

आमदार रवी राणांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली, म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2021 5:51 PM

MLA Ravi Rana: एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राज्यात राजकारणही जोरात सुरू आहे. दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न विचारताना भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांचा तोल ढळला असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे.

ठळक मुद्दे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर बेशरमचं झाड लावलं पाहिजे या बेशरमच्या झाडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संदेश जाईल, की कितीही ओरडलो, कितीही वेळा बोललो, कितीही वेळा मागणी केली, तरी राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेतत्यांना बेशरमचं झाडंच लागू पडेल. त्यामुळे मी येणाऱ्या काळात बेशरमचं झाड लावणार आहे

मुंबई - कोरोनाकाळामध्ये परीक्षा लांबवणीवर पडल्याने तसेच इतर काही कारणांमुळे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांमध्ये राज्य सरकारविरोधात संतापाची भावना आहे. दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून राज्यात राजकारणही जोरात सुरू आहे. दरम्यान, एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात प्रश्न विचारताना भाजपा समर्थक आमदार रवी राणा यांचा तोल ढळला असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. (MLA Ravi Rana criticized the Chief Minister Uddhav Thackeray in offensive language )

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून एमपीएससीच्या मुद्द्यावर बोलताना आमदार रवी राणा म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीसमोर बेशरमचं झाड लावलं पाहिजे. या बेशरमच्या झाडाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला संदेश जाईल, की कितीही ओरडलो, कितीही वेळा बोललो, कितीही वेळा मागणी केली, तरी राज्याचे मुख्यमंत्री बेशरम आहेत. त्यांना बेशरमचं झाडंच लागू पडेल. त्यामुळे मी येणाऱ्या काळात बेशरमचं झाड लावणार आहे. जेणेकरून त्यांच्यामध्ये काही ना काही परिवर्तन होईल आणि ते दिलासा देण्याचा निर्णय घेतील.

आमदार रवी राणा हे फेसबूक लाईव्ह करत होते. काही दिवसांपूर्वी एमपीएससी पास झालेल्या स्वप्निल लोणकर या तरुणाने आत्महत्या केली होती. हा मुद्दा त्यांच्या फेसबुक लाईव्हमध्ये केंद्रस्थानी होता. त्यावरून रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर ही टीका केली. रवी राणा हे अमरावती जिल्ह्यातील आमदार आहेत. नुकत्याच आटोपलेल्या विधानसभा अधिवेशनावेळी रवी राणा यांनी तालिका अध्यक्षांसमोरील राजदंड पळवून कामकाज बंद पाडण्याचा प्रयत्न केला होता. 

टॅग्स :Ravi Ranaरवी राणाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMPSC examएमपीएससी परीक्षाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliticsराजकारण