नवी मुंबईतील वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) आज वाशी न्यायालयात हजेरी लावणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक रोखठोक ट्विट करण्यात आलं आहे. (Raj thackeray appearing in font of belapur court)
"शेकडो गुन्हे दाखल केले गेले असले तरी ज्वलंत विचार आणि बुलंद आवाज रयतेच्या न्याय हक्कांसाठी घुमणारच..!", असं ट्विट मनसेनं केलं आहे. विशेष म्हणजे, ज्या वाशी टोल नाक्याची २०१४ साली तोडफोड करण्यात आली होती. त्याच टोल नाक्यावर राज ठाकरे यांच्या स्वागताचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत.
राज ठाकरेंच्या भाषणानंतर झाली होती तोडफोड२६ जानेवारी २०१४ रोजी वाशीमध्ये राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. राज ठाकरे यांच्या या भाषणानंतर मनसैनिकांनी वाशी टोलनाक्याची तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबतच राज ठाकरे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर वाशी न्यायालयात सुनावणी सुरु आहे. २०१८ आणि २०२० मध्येही राज यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ते हजर न राहिल्यानं वाशी न्यायालयानं त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केलं आहे. त्यामुळे आज राज ठाकरे यांना न्यायालयात हजर राहावं लागणार आहे.
मनसेचा 'एकला चलो रे'चा नारामनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यातील त्यांच्या 'राजमहल' या निवास्थानामध्ये मनसे शहर पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात शहरातील पक्षाच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. निवडणुकीच्या तयारीला लागायची सूचना कार्यकर्त्यांना केली आहे. यावेळी मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांच्या धर्तीवर 'एकला चलो रे 'ची भूमिका घेण्याची विनंती पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरे यांना केली आहे.