मुंबई – महाराष्ट्रावर येऊ घातलेलं संकट आहे त्यासाठी राज ठाकरे असतील किंवा ज्यांना या महाराष्ट्रावर प्रेम आहे सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे, यासाठी माझं सगळ्यांशी बोलणं सुरु आहे असं मत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मांडलं आहे. त्यामुळे शिवसेनेने पुन्हा राज ठाकरेंना साद घातल्याचं दिसून येत आहे.
याबाबत संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात दोन प्रमुख नेते कायम राज्याच्या हितासाठी लढत राहिलेत, एक बाळासाहेब ठाकरे आणि दुसरे शरद पवार..शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे नेहमी महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अस्मितेचा झेंडा घेऊन राष्ट्रीय स्तरावर उभे राहिले आहेत. राजकीय मतभेद असतील पण महाराष्ट्रावर जे संकट येत आहे त्यावेळी राज ठाकरेच काय तर सगळ्यांनीच एकत्र आलं पाहिजे ही माझी भूमिका आहे असं ते म्हणाले.
तसेच महाराष्ट्रातील प्रमुख नेते, जे मराठी जपण्याचं काम करतायेत, त्यांच्यामागे मराठी जनता उभी आहे. त्यांचा वापर करण्याचं काम त्यांना बदनाम करण्याचं काम केलं जात आहे असं सांगत राऊत यांनी राज ठाकरेंबाबत अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.
मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे
प्रत्येक सत्ताधारी पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करत आहेत, मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत जाहीरपणे बोलणार नाही, नवीन वाद निर्माण होईल असं वक्तव्य करणार नाही. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. शरद पवार, अशोक चव्हाण आणि एकनाथ शिंदे या प्रश्नावर लक्ष ठेऊन आहेत. रोजगार का मिळत नाही म्हणून समाज रस्त्यावर उतरतोय त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असं राऊत यांनी सांगितले.
बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रे कमलेखालचे वार करणारी नव्हती.
मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान, कोणाबद्दल घृणास्पद चित्र पसरवायची याचं समर्थन करायचं का? कमरेखालचे वार बाळासाहेबांनी कधी केले नाहीत. मोरारजी देसाई यांच्यावरही ते वार केले नाही, बाळासाहेबांच्या व्यंगचित्राचं कौतुक विरोधकांनीही केले आहे. महापालिका स्वतंत्र्य स्वायंत्त संस्था आहे. त्यांना जे बेकायदेशीर दिसलं त्याबद्दल त्यांनी कारवाई केली आहे. संजय राऊत कधीही दिशाभूल करत नाही, आम्ही जे मांडले परखड आणि सत्य मांडत आलोय. माझी भूमिका ठरवणारे मंत्री कोण? पक्षाची जी भूमिका आहे ती मांडतो, ठाकरे कुटुंबावर जर कोणी आरोप करत असेल तर मी बोलणारच...आमचे सगळे नेते बोलतात पण त्यांच्या बोलण्याला मीडियाने महत्त्व दिलं नसावं असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा - राऊत
ठाकरे हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एक ब्रँड आहे. दुसरा महत्त्वाचा ब्रँड पवार नावाने चालतो आहे. मुंबईतून या ब्रँडनाच नष्ट करायचे आणि त्यानंतर मुंबईवर ताबा मिळवायचा हे कारस्थान पुन्हा एकदा उघडे पडले आहे. राज ठाकरे हेसुद्धा त्याच ब्रँडचे एक घटक आहेत. या वादाचा फटका त्यांनाही बसणार आहे, शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात. पण शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँडचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ठाकरे ब्रँडचे पतन होईल. त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल असं राऊत म्हणाले होते.
...तेव्हा तुमचा धर्म कुठे गेला होता? -मनसे
मनसेची अधिकृत भूमिका राज ठाकरे मांडतील, पण ज्यावेळी २००८ मध्ये परप्रांतीयांच्या विरोधात मनसे लढा देत होती तेव्हा राजसाहेबांच्या बाजूने बोलायला शिवसेना खासदार संसदेत गप्प होती. पाकिस्तानी कलाकारांना हटवण्यासाठी मनसे आंदोलन करत होती तेव्हा शिवसेना गप्प होती. रातोरात मनसेचे ६ नगरसेवक चोरले तेव्हा शिवसेनेने डाव साधला. २०१४-२०१७ मध्ये बाहेरच्या लोकांविरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंनी साद घातली तेव्हा शिवसेना गप्प होती अशी आठवण मनसेने शिवसेनेला करुन दिली होती. तर महाभारतात जेव्हा कर्णाचं चाक चिखलात रुतलं, तेव्हा कृष्णाने जे कर्णाला म्हटलं होतं, त्यावेळी कुठे गेला होता तुमचा धर्म...तेच आज आम्ही सांगतो. बाळासाहेबांचा जो ठाकरे ब्रँड आहे तो जपण्यासाठी राज ठाकरे समर्थ आहेत. मात्र शिवसेनेच्या सादेबाबत जी पक्षाची भूमिका असेल ती राज ठाकरेंची असेल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं होतं.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
“सत्तेत असलो म्हणून काहीही सहन करायचं का?; आमच्या दैवतावर टीका कराल तर मर्यादा सुटणारच”
जवानांच्या सुरक्षेसाठी ‘भाभा कवच’; एके ४७ ची गोळीही भेदणार नाही, जाणून घ्या वैशिष्ट्ये
योगींचा ड्रीम प्रोजेक्ट! यूपीत स्पेशल सिक्युरिटी फोर्सची स्थापना; विनावॉरंट अटक करण्याचे अधिकार
मुंबईतून जाता जाता कंगना राणौतची शेरोशायरी; PoKवरून हटेना, टार्गेट शिवसेना!