मुंबई: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे मुंबईत ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व दुकान व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा सुरू होण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाकरे सरकारवर टीका केली असून, सर्व लोकांना कामावर जाण्यासाठी पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या, असा टोला लगावला आहे. (mns sandeep deshpande criticized thackeray govt over not permit to people travel in mumbai local)
लसीकरण झालेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा का देत नाही. लसीकरण झालेल्यांना घरी बसायला लावू शकत नाही. त्यांच्याही अडचणी आहेत. लसीकरण झाल्यानंतरही लोकांनी घरातच बसून रहावे आणि कामावर जाऊ नये, असे अभिप्रेत नाही. रस्त्यांची अवस्था पहा, नोकरदारांना दररोज दोन्ही बाजूंच्या प्रवासासाठीही तब्बल सहा-सहा तास लागत आहेत. समाजातील सर्वच घटकांचे लसीकरण झालेले असल्यास मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगी देण्याविषयी राज्य सरकारने काही धोरण ठरवले आहे का?, अशी विचारणा उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला केली आहे. तरीही लोकल प्रवासाला मुभा देण्यास सरकार तयार नसल्याचे दिसत आहे. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
Vi मोजतंय अखेरच्या घटका! बिर्ला यांची मोठी ऑफर; सरकारच्या ताब्यात जाणार कंपनी?
सर्व लोकांच्या पाठीवर ‘शिव पंख’ लावून द्या
सीएम साहेब आपण सर्व आस्थापना चालू केल्याबद्दल आपले आभार. लोकल बंद आहेत, बसला प्रचंड वेळ लागतो. गर्दीही असते. आपल्याला विनंती आहे या सर्व लोकांच्या पाठीवर जर आपण ‘शिव पंख’ लावून दिलेत, तर त्यांना कामावरही जाता येईल आणि त्रास पण नाही. मला खात्री आहे आपण हे करु शकता, आमचा सीएम जगात भारी, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.
मनसेने दिला रेलभरो आंदोलनाचा इशारा
अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना मुंबईत लोकलने प्रवास करण्याची परवानगी मिळावी, याविषयी पत्र लिहिले होते. त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतलेत त्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या. नाहीतर मनसेला रेलभरो करावे लागेल, असा इशाराच ठाकरे सरकारला दिला होता.
“पेगॅससचे सत्य समोर आलेच पाहिजे, तपास होणे गरजेचे”; भाजपच्या ज्येष्ठ नेत्याची मागणी
दरम्यान, मुंबईत रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के आहे. तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवरपासून शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. आताच्या घडीला चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असलेल्या दुकानांच्या वेळेमध्ये वाढ करून देण्याची मागणी मंजूर करण्यात आली असून, सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असणार आहे. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आठवड्याचे सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी असेल.