मुंबई: गेल्या काही दिवासांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असा गंभीर आरोप केला होता. यानंतर राष्ट्रवादीकडूनही राज ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यात आले. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेतला. यानंतर आता मनसेकडून राष्ट्रवादीवर पलटवार करण्यात आला असून, राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोला लगावण्यात आला आहे. (mns sandeep deshpande replied ncp over caste politics in the state)
“महाराष्ट्राला सर्वाधिक लसी दिल्या, तरी ठाकरे सरकारची तक्रार आहेच”; भारती पवारांचे टीकास्त्र
राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर पत्रकारांनी शरद पवारांना पत्र विचारला असता. पवार म्हणाले की, मला त्याविषयी काही बोलायचे नाही. परंतु राज ठाकरेंना माझा सल्ला आहे की, प्रबोधनकारांचे लिखाण वाचा, प्रबोधनकारांचे लिखाण नक्कीच त्यांना योग्य रस्ता दाखवेल, अशी मला खात्री आहे. बाकी यावर शरद पवार यांनी काहीही भाष्य केले नाही. यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे.
भावना ताई, ७ कोटींची कॅश आली कुठून?; चोरीच्या तक्रारीवरून भाजपा नेत्याचा मार्मिक सवाल
पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं
राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं आणि संकुचित राजकारण करायचं हे महाराष्ट्र गेले वीस वर्षे बघत आहे, असा खोचक टोला लगावणारे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. तसेच राष्ट्रवादीने जे केले ते राज ठाकरे बोलले आहेत, यात चुकीचे काही नाही, असे सांगत जे कोणी आता राज ठाकरे यांच्या भूमिकेवर बोलत आहेत त्यांना योग्य उत्तर दिले जाईल, असा अप्रत्यक्ष इशारा प्रवीण गायकवाड यांना दिला आहे.
अफगाणिस्तानवर ताबा मिळवणारे तालिबानी कोण आहेत? कुठून येतो पैसा आणि रसद?
दरम्यान, राज्यात जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटिटीचा मुद्दा झालाय. राज्यात जातीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर मोठा झाला, असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला. ज्या महाराष्ट्राने देशाला विचार दिला, त्याला जाती-पातींमध्ये खितपत ठेवायचे का आपण? पूर्वी फक्त नावे विचारल्यानंतर तुम्ही कुणापैकी असे विचारायचे. म्हणजे तुझी जात कोणती? पण हे फक्त तिथपर्यंतच होते. पण आता अगदी शाळेपर्यंत हे उतरलेय, असेही राज ठाकरे म्हणाले होते.