शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

"बहिरं सरकार ऐकेल का?"; 'तो' Video शेअर करत मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2021 8:39 PM

MNS Sandeep Deshpande Slams Thackeray Government : मनसेने (MNS) ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल केला आहे. 

मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली असून रुग्णांचा आकडा 3,02,33,183 वर पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 50,040 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 1,258 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 3,95,751 लोकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. सर्वसामान्यांसाठी सध्या लोकल सेवा ही बंद करण्यात आली आहे. याच दरम्यान मनसेने (MNS) ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर एका तरुणाचा व्हायरल झालेला व्हिडीओ शेअर करत हल्लाबोल केला आहे. 

लोकल प्रवासास बंदी असल्याने होत असलेल्या त्रासाबद्दल एका तरुणाने रेल्वेच्या खंत व्यक्त केली आहे. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ ट्वीट करत मनसेनं ठाकरे सरकारला सवाल केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे (MNS Sandeep Deshpande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "बहिरं सरकार ऐकेल का???" असं म्हणत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचाऱी वगळता इतरांना लोकलमधून प्रवास करण्यास बंदी आहे. मात्र असं असतानाही या तरुणाने लोकलमधून प्रवास केला. 

परेल स्थानकावर टीसीने तरुणाला पकडलं. त्यानंतर त्याने व्हिडीओ करून लोकल प्रवासाच्या बंदीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. "आज नोकरीचा दुसराच दिवस आहे. परेल स्थानकावर आल्यानंतर टीसीने मला पकडलं. एक दीड वर्षांपासून घरी होतो. आता नोकरी मिळाली आहे. यात टीसीची काहीच चूक नाही. ते त्यांचं काम करत आहेत. पण सरकारला जाग कधी येणार आहे? सर्वसामान्य माणसं रोज कमावतात आणि खातात. त्या लोकांनी काय करायचं? त्या लोकांनी कुठे जायचं? आज माझ्या खात्यावर चारशे रुपये आहेत."

"खूप मेहनतीनंतर नोकरी मिळाली आहे. तिकीट मिळत नाहीत, पासही मिळत नाहीत. पण सरकारी नोकरदार नाही म्हणून आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आमच्याकडे आज पैसे नाहीत आणि तरीही आमच्याकडून दंड वसूल केला जात असेल. सरकार अशी लुबाडणूक करत असेल, तर आमच्यासारख्या गरीब मुलांनी काय करायचं? लोकलमध्ये प्रचंड गर्दी होत आहे. लोक फिरत आहेत मग का कोविड कोविड करत बसायचं?, लोकं जगणार कशी?" असं तरुणाने आपल्या व्हि़डीओत म्हटलं आहे." तरुणाचा हा व्हिडीओ शेअर करत मनसेने सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. 

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याUddhav Thackerayउद्धव ठाकरे