मुंबई - औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता मनसेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते. तर आता या मुद्द्यावरून मनसेनेही शिवसेनेची कोंडी केली आहे. अग्रलेख काय लिहित बसलाय, नामांतर करायचं तर लवकर करा, असा सल्ला मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यातील सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे.औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरताना संदीप देशपांडे म्हणाले की, आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा. तसेच २६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करा, तसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असे अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आले आहे. आताची शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. त्यामुळे ते केवळ अग्रलेख लिहीत आहेत. त्यांना कृती करणे जमत नाही, असा टोलाही संदीप देशपांडे यांनी लगावला.
"अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम
By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 14:30 IST
Sandeep Deshpande News : आता सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं. अग्रलेख लिहीत बसण्यापेक्षा औरंगाबादचं नामांतर करायचं तर लवकर करा.
अग्रलेख काय लिहित बसलाय, औरंगाबादचं नामांतर लवकर करा’’, शिवसेनेला अल्टिमेटम
ठळक मुद्दे२६ जानेवारीपर्यंत औरंगाबादचं संभाजीनगर अस नामांतर करातसे न झाल्यास तीव्र आंदोलन उभे केले जाईल, असे अल्टिमेटम मनसेकडून देण्यात आले सत्ता महत्त्वाची की मराठी अस्मिता महत्त्वाची हे शिवसेनेने ठरवावं