शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मोदी-शाहंच्या 'खेळी'मुळे काँग्रेसचा 'खेळ खल्लास'; किरण बेदींना हटवलं, पुडुचेरी सरकार पाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 12:59 PM

congress government falls in puducherry : अमित शाह, मोदींची खेळी झाली यशस्वी, पुडुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलं

ठळक मुद्देअमित शाह, मोदींची खेळी झाली यशस्वी, पुडुचेरीतील काँग्रेसचं सरकार कोसळलंयापूर्वी पुडुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेंदींनाही आलं होतं हटवण्यात

पुडुचेरीमध्येकाँग्रेसला मोठा झटका लागला आहे. पुडुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात अपयश आलं. त्यानंतर पुडुचेरीतील सरकारल कोसळलं. पुडुचेरी विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री नारायणसामी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी उपराज्यपालांना आपला राजीनामा सोपवला. रविवारी दोन आमदारांनी आपला राजीनामा दिल्यानंतर पडुचेरीमध्ये राजकारण तापलं होतं. पुडुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून किरण बेदी यांना हटविताना त्याचा काँग्रेसला फायदा मिळू नये, अशी व्यवस्था मोदी सरकारनं केली होती. राज्यातील काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामे दिल्याने नारायणस्वामी सरकार अल्पमतात आलं होतं. किरण बेदी यांनीच हे घडवून आणलं, अशी टीका काँग्रेस करत होती. त्यामुळे लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेसला सहानुभूती मिळेल, अशी शक्यता व्यक्त होत होती. याच कारणामुळे बेदी यांना हटवून काँग्रेसच्या पायाखालची चादर भाजपने काढली. गृहमंत्री अमित शाह यांनी योग्य वेळी ही खेळी केली.सहानुभूती मिळणं कठिणकिरण बेदीच पदावर नसल्यानं काँग्रेसला सहानुभूती मिळणं अवघड होईल. राज्यात निवडणुका असल्याने राहुल गांधी यांनी काही दिवसांत तेथील नेत्यांशी दिल्लीत चर्चा केली. विश्वासातील नेते दिनेश गुंडू राव यांच्याकडे पुडुचेरीची जबाबदारी सोपविली. राहुल गांधी बुधवारी पुडुचेरीच्या दौऱ्यावर असल्यानं त्याआधी एक दिवस बेदी यांना दूर करण्यात आलं. बेदींना दूर करण्याची मागणीसरकारच्या कामात निष्कारण हस्तक्षेप करणाऱ्या, सरकारला काम करू न देणाऱ्या किरण बेदी यांना दूर करावे, अशी मागणी मुख्यमंत्री नारायणस्वामी यांनी सातत्यानं केली होती. भाजपनं पुडुचेरी निवडणुकांसाठी केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल व राजीव चंद्रशेखर यांची नेमणूक केली आहे. त्यांच्यामार्फत हा केंद्रशासित प्रदेश ताब्यात घेण्याचा अमित शहा व जे. पी. नड्डा यांचा प्रयत्न आहे.काय आहे राजकारण?तेलंगणाच्या राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांच्याकडे काही काळासाठी पुडुचेरीची जबाबदारी सोपवण्यातही राजकारण आहे. तामिळ भाषकांच्या पुडुचेरीत मूळ तामिळनाडूच्या सौंदरराजन काम पाहतील. नारायणस्वामी यांच्याप्रमाणेच सौंदरराजन याही नाडर समाजाच्या आहेत.

टॅग्स :puducherry-pcपुडुचेरीAmit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीKiran Bediकिरण बेदीBJPभाजपाcongressकाँग्रेस