शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
2
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
3
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
4
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
5
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
6
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
7
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
8
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
9
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
10
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
11
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
12
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
14
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
16
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
17
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
18
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
19
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
20
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य

मोदींकडून अच्छे दिनचा शब्दप्रयोग बंद का?-सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 12:19 AM

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले.

मुरुड : भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला धर्मनिरपेक्ष विचार दिले. जातीयवादी शक्तींपासून देशाचे संरक्षण केले. हे धर्मनिरपेक्ष विचार जोपासत जातीयवादी शक्तीला सामोरे जाण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र आले. नेहरू, शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग यांनी देशाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा देशाचे नेतृत्व त्यांनी उत्तमपणे पार पाडले. आधुनिक तंत्रज्ञान राजीव गांधींनी देशात आणले. मनमोहन सिंगांनी दहा वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली. देशाची अर्थव्यवस्था मजबूत ठेवली. २०१४ ला मोदींनी अच्छे दिनचे स्वप्न दाखवले; पण आता ते हा शब्दप्रयोग वापरत नाहीत, असे प्रतिपादन महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनील तटकरे यांनी केले. ते मुरु ड येथील नांदगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप तसेच इतर मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराच्या सभेत बोलत होते.मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी जनधन खाती उघडा, १५ लाख येतील, असे सांगून लोकांचा अपेक्षाभंग केला. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन तरु णांना दिले. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नोटाबंदीने आर्थिक व्यवसायाला फटका बसला. शेतकऱ्यांना दीडपट आधारभूत किंमत देण्याचे सांगण्यात आले. मात्र, असे काहीही झाले नाही. महाराष्ट्र व दिल्लीतील सरकारच्या अपयशामुळे आज देश पिछाडीवर गेला आहे. या सरकारने लोकशाही असलेल्या आपल्या देशात व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणली, असे आरोप त्यांनी केले. १९९३ मध्ये अडवाणींनी राममंदिर बांधू असे सांगितले. उद्धव ठाकरेंनी अयोध्येत जाऊन कुंभकर्णाला उठवायला आलोय असे सांगितले. आता यांच्यात काय तडजोड झाली ते कळत नाही, असेही तटकरे म्हणाले.शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी निधी संपवणे एवढेच कर्तव्य मानले; पण त्या व्यतिरिक्त काही केले नाही, अशी टीका त्यांनी गीते यांच्यावर केली. मुरुड परिसरात कोणतीही विकासकामे त्यांनी केली नाहीत. गीतेंनी मुरुडमध्ये १५ लाखांच्या शौचालयांव्यतिरिक्त काहीही केले नाही. दहा वर्षांपूर्वी मुरुडला पर्यटनाचा दर्जा मी मिळवून दिला. आज गीते हे आपल्या नावावर सांगत आहेत. अवजड उद्योगमंत्री असून मतदारसंघात खा. गीतेंनी एकही कारखाना आणला नाही, असे सांगतानाच येथे रोजगार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले. मला मुंबई-गोवा महामार्ग टोलमुक्त करायचा आहे. रेल्वेचे प्रश्न सोडवायचे आहेत, असे सांगितले. या वेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू ठाकूर, जि.प. उपाध्यक्ष आस्वाद पाटील, श्रद्धा ठाकूर आदी उपस्थित होते.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Narendra Modiनरेंद्र मोदीraigad-pcरायगड