पाटणाः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारमधून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं आहे. त्यांनी लोक जनशक्ती पार्टी(लोजपा)चे उमेदवार चिराग पासवान यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी सभेला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. बिहारमध्ये आरक्षणासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ, मोदी असू देत किंवा दुसरं कोणी, कोणीही आरक्षणाला हटवू शकत नाही.काँग्रेसनं आपल्या संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर कशा प्रकारचा व्यवहार केला हे सगळ्यांनाच माहीत आहे. काँग्रेसनं त्यांच्या पराभव करण्यासाठी षडयंत्र रचलं. परंतु आजच्या तरुण पिढीला यासंदर्भात काहीही माहिती नाही. मोदी म्हणाले, काँग्रेस बाबासाहेबांबरोबर कसं वागलं. त्यांना हरवण्यासाठी किती षडयंत्र रचली. स्वतःच्या परिवारातील सदस्याला काँग्रेसनं भारतरत्न दिलं, परंतु ते बाबासाहेबांना विसरले. भाजपा आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या प्रयत्नांमुळेच बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कार मिळाला. आज जग भारताबरोबर उभं आहे, परंतु विरोधक पाकिस्तानसारखेच बोलत आहेत.
बिहारमध्ये आरक्षणासंदर्भात अफवा पसरवणाऱ्यांना सोडणार नाही- मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2019 9:08 PM