शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
2
"मुंबईकरांच्या हक्काच्या जागा बळकवायचा सरकारचा अजेंडा", 'त्या' निर्णयावर काँग्रेसचा संताप
3
Irani Cup 2024 : ३ बळी! मुकेश कुमारनं मुंबईच्या फलंदाजीला सुरुंग लावला; रहाणे-अय्यरवर मोठी जबाबदारी
4
IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट
5
"फडणवीसांपासून इतर सगळे नेते कूचकामी म्हणून...", संजय राऊतांचे अमित शाहांवर टीकेचे बाण
6
Nepal Floods : हाहाकार! नेपाळमध्ये पूर आणि भूस्खलनामुळे विध्वंस; मृतांची संख्या २१७ वर, १४३ जण जखमी
7
...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."
8
सर्वपित्री अमावास्या: ५ गोष्टी आवर्जून करा, पूर्वज वर्षभर राहतील प्रसन्न, देतील शुभाशीर्वाद!
9
Tata Steel News: टाटा स्टीलनं 'हा' प्रकल्प केला बंद, हजारो लोकांची नोकरी जाणार का?
10
नायर हॉस्पिटल-कॉलेजमधील विद्यार्थिनींची मनसेकडे धाव; लैंगिक छळाचा धक्कादायक आरोप
11
"सीनियर्सने ४८ तास उभं केलं, मैत्रिणीने अचानक..."; डॉक्टरच्या मृत्यूनंतर बहिणीचे गंभीर आरोप
12
IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!
13
रवीना टंडनच्या विरोधात कोर्टाचे चौकशीचे आदेश, अभिनेत्रीवर धमकावल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
14
Chirag Paswan : "...तर मी एका मिनिटात मंत्रिपदाचा राजीनामा देईन"; चिराग पासवान यांचं मोठं विधान
15
अजित पवारांच्या पक्षाला मिळणार नवं चिन्ह?; सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी
16
UPI Payment : फोनमध्ये इंटरनेट नाहीये? टेन्शन कसलं! पाहा विना इंटरनेट कसं करू शकता UPI Payment
17
चतुर्ग्रही योगात नवरात्रारंभ: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, बँक बॅलन्स वाढ; प्रमोशन संधी, लाभच लाभ!
18
Navratri 2024: नवरात्र नऊ दिवसच का? घटस्थापना का करतात? नवरात्रीची उपासना कोणती? वाचा!
19
तनुश्री दत्ता गेल्या सहा वर्षांपासून आहे बेरोजगार; म्हणाली, "Me Too मधील आरोपींनीच..."
20
स्वत: पाकिस्तानी, बायको बांगलादेशी; 'हिंदू' आडनाव लावून गेली १० वर्ष भारतात वास्तव्य

"मोदींची लोकप्रियता घटलीये", प्रशांत किशोरांचं एनडीए सरकारच्या स्थिरतेबद्दल मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 9:49 AM

Prashant Kishor PM Modi : पंतप्रधान मोदींची लोकप्रियता घसरली असून, आगामी काळात ९ राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे निकाल एनडीए सरकारचे भवितव्य ठरवतील, असे विधान प्रशांत किशोर यांनी केले आहे. ते नेमकं काय म्हणाले?

Prashant Kishor on PM Modi : पूर्वाश्रमीचे राजकीय रणनीतीकार आणि जन सुराज संघटनेचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेबद्दल मोठं विधान केले आहे. त्याचबरोबर एनडीएचे सरकारच्या स्थैर्याबद्दलही प्रशांत किशोर यांनी भविष्यवाणी केली आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता घटली आहे, यात कोणताही संशय नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वीच मी म्हटलं होतं की, मोदींची लोकप्रियता घसरत आहे", असे प्रशांत किशोर म्हणाले.

मोदींची लोकप्रियता, एनडीए सरकारचे भवितव्य; प्रशांत किशोर काय म्हणाले?

प्रशांत किशोर म्हणाले की, "यामध्ये कोणताही संशय नाही की, पंतप्रधान मोदी आणि एनडीएची सरकारची लोकप्रियता घसरली आहे. एनडीए सरकारचा पुढील कार्यकाळ दोन अडीच वर्षात नऊ राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या निकालांवर जास्त अवलंबून असेल."

याच मुद्द्यावर प्रशांत किशोर म्हणाले, "जर ९ राज्यांमधील निकाल भाजपाच्या विरोधात लागले, तर सरकारच्या स्थैर्याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागतील. पण, जर भाजपाने या राज्यांत चांगली कामगिरी केली, तर त्यांचे सत्ता कायम राहील", अशी भविष्यवाणी प्रशांत किशोर यांनी केली. 

कोणत्या राज्यात होणार आहेत विधानसभा निवडणूक?

हरियाणा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, झारखंड, दिल्ली, बिहार, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल  या राज्यात २०२६ पर्यंत विधानसभा निवडणूक होतील. यातील सर्वच राज्यातील भाजपाच्या कामगिरीकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. 

"भाजपाची ही मजबुरी आहे"

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याबद्दल बोलताना प्रशांत किशोर म्हणाले, "भाजपाची ही मजबुरी आहे की, ते नितीश कुमार यांना मुख्यमंत्रि‍पदावरून हटवू शकत नाही. भाजपाला माहिती आहे की, नितीश कुमार मुख्यमंत्री राहिले, तर बिहारमध्ये ते निवडणूक जिंकू शकत नाही; पण ते बिहारमध्ये काही करू शकत नाही. कारण दिल्लीत सरकार चालवण्यासाठी त्यांना नितीश कुमारांच्या मदतीची गरज आहे."

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPrashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४