शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

निवडणूक रिंगणात पक्षीय उमेदवारांपेक्षा अपक्षच अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 5:27 AM

कधी पक्षाने तिकीट नाकारल्याचे दु:ख, त्यामुळे दुखावलेला अहंकार तर कधी एखाद्या मोठ्या पक्षाच्या छत्रछायेखाली राजकीय गणित जुळविण्यासाठी आर्थिक लाभ उठवत स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष.

नवी दिल्ली - कधी पक्षाने तिकीट नाकारल्याचे दु:ख, त्यामुळे दुखावलेला अहंकार तर कधी एखाद्या मोठ्या पक्षाच्या छत्रछायेखाली राजकीय गणित जुळविण्यासाठी आर्थिक लाभ उठवत स्थापन केलेला स्वतंत्र पक्ष... अशी स्थिती निवडणूक जवळ आली की पाहायला मिळते. यासंदर्भात भारतीय निवडणूक आयोगाकडील उपलब्ध माहितीनुसार आकड्यांचेच गणित मांडायचे झाल्यास लोकसभा निवडणुकीत १९९८ पासून एकूण उमेदवारांपैकी चक्क निम्मे उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात उभे होते.पाहायला गेल्यास निवडणूक लढविणे बरेच खर्चीक असते; शिवाय अनोळखी पक्षाच्या किंवा अपक्ष उमेदवाराला आपला नेता म्हणून निवडून देण्यात अनेकदा मतदारांना स्वारस्य नसते. हे माहीत असूनही अशा प्रकारे अपक्ष किंवा वेगळा पक्ष काढून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचा आकडा वाढतच आहे. भारतीय निवडणूक आयोगाकडील आकडेवारीनुसार, १९९८ मध्ये एका लोकसभा मतदारसंघातील सरासरी उमेदवार ८.७ एवढे होते. ते २०१४ मध्ये १५.२ एवढे वाढले. या वर्षांमध्ये एका मतदारसंघातील सर्वाधिक उमेदवार अनुक्रमे ३४ आणि ४२ एवढे होते. १९९८ पासून दरवर्षी या उमेदवारांमध्ये वाढच होत आहे.उभ्या राहणाऱ्या उमेदवारांपैकी अनेकांसाठी निवडणूक लढविणे म्हणजे स्थानिक लोकप्रियता मिळविण्याचा सोपा मार्ग असतो. आपण जिंकणार नाही, याची जाणीव त्यांना असते. पण स्वत:चा अधिकाधिक प्रचार करणे किंवा काहीही करून मिळेल त्या मार्गाने आपला प्रभाव पाडणे हेच त्यांचे ध्येय असते. काही प्रकरणांमध्ये पुढे याच उमेदवारांनी मोठ्या पक्षांसोबत हातमिळवणी केलेली पाहायला मिळते. मतांची खेळी करणे किंबहुना मते फोडण्यासाठीदेखील या उमेदवारांचा वापर होतो, असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.अनेकदा तिकीट नाकारले गेल्यामुळेदेखील बंडखोरी होते. या प्रकरणी कर्नाटकचे उदाहरण बोलके ठरेल. लोकप्रिय कन्नड अभिनेते आणि काँग्रेसचे दिवंगत नेते अंबरीश यांच्या पत्नी सुमलता यांनी काँग्रेसविरोधात बंडाचे निशाण फडकवले आहे. मंड्या मतदारसंघातून त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. आता तिथे त्यांची लढत थेट मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे पुत्र निखिल कुमारस्वामी यांच्याशी असेल.प्रत्यक्षात या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सुमलता इच्छुक होत्या. परंतु वाटाघाटीत हा मतदारसंघ काँग्रेसने धर्मनिरपेक्ष जनता दलाला सोडला. त्यामुळे संतापलेल्या सुमलता यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. त्यांचे दिवंगत पती अंबरीश चित्रपट अभिनेते होते. त्यांचीही रूपेरी पडद्यावरील प्रतिमा बंडखोर नायक अशीच होती. आता त्यांच्या पत्नीने बंडाची ‘परंपरा’ कायम ठेवली आहे. काही पक्ष तर निवडणुकीच्या तोंडावर उदयाला आलेले पाहायला मिळतात. तर काही मतांचे विभाजन करण्यासाठी बड्या पक्षांनी जन्माला घातलेले असतात. (वृत्तसंस्था)...म्हणूनच वाढते संख्यातिकीट न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडून नव्या पक्षाच्या रूपात स्वतंत्र चूल मांडली जाते. अनेकदा मते फोडण्यासाठी अपक्षांना भाव येतो. साहजिकच पक्षातून उभ्या राहणाºया उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारच अधिक होतात आणि निवडणूक लढवणाºया उमेदवारांची संख्या वाढते. या प्रकरणी २०१४ चे उदाहरण बोलके आहे. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या १० महत्त्वाच्या राज्यांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार उभे होते....म्हणूनच वाढते संख्यातिकीट न मिळाल्याने पक्षातून बाहेर पडून नव्या पक्षाच्या रूपात स्वतंत्र चूल मांडली जाते. अनेकदा मते फोडण्यासाठी अपक्षांना भाव येतो. साहजिकच पक्षातून उभ्या राहणाºया उमेदवारांपेक्षा अपक्ष उमेदवारच अधिक होतात आणि निवडणूक लढवणाºया उमेदवारांची संख्या वाढते. या प्रकरणी २०१४ चे उदाहरण बोलके आहे. २०१४ मध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि दिल्ली या १० महत्त्वाच्या राज्यांत प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक २१ उमेदवार उभे होते.निवडणूक आयोगाकडे नोंदणी केलेल्या पक्षांची संख्या २०१४ मध्ये १,७०९ एवढी होती ती १० मार्च २०१९ पर्यंत २,३५४ एवढी वाढली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघामागे केवळ तीन ते चार उमेदवारच प्रामाणिकपणे निवडणुकीच्या रिंगणात उभे राहत असल्याचे मतही राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकPoliticsराजकारण