शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

MP Crisis: काँग्रेसचे आणखी काही आमदार भाजपाच्या संपर्कात; पोटनिवडणुकीनंतर सोडणार साथ

By प्रविण मरगळे | Published: October 28, 2020 9:25 AM

Madhya Pradesh, Congress, BJP Mla News: पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

ठळक मुद्देपोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी कॉंग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे काय?आमदारांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इतर अनेक आमदार संपर्कातजर भाजपला अशा पद्धतीने आमदारांना विकत घ्यायचे असेल तर पोटनिवडणुका का घेत आहेत? - काँग्रेस

भोपाळ -  मध्य प्रदेशच्या राजकारणात गेल्या ७ महिन्यांत अनेक काँग्रेसआमदारांनी पक्षाला रामराम करत भाजपाची वाट धरली. आतापर्यंत २६ आमदारांनीकाँग्रेसचा हात सोडून भाजपाला साथ दिली. ज्योतिरादित्य शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात काँग्रेसचं सरकार कोसळलं आणि भाजपाला सत्तास्थापन करण्यात यश आलं. आता आणखी काही आमदारांच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपाने केला आहे.

पुढील काही दिवसांत या आमदारांची नावेही समोर येऊ शकतात, तर कॉंग्रेस लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. पोटनिवडणुकीदरम्यान कॉंग्रेसचे आणखी एक आमदार भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर अजून काही आमदार संपर्कात आहेत, असा भाजपा नेत्यांचा दावा आहे. अशा परिस्थितीत पोटनिवडणुकीच्या निकालाच्या आधी कॉंग्रेसला आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

भाजपा नेते पंकज चतुर्वेदी म्हणाले की, भाजपामध्ये सामील झालेल्या नेत्यांचे स्वागत आहे. आमदारांच्या प्रवेशामुळे कॉंग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. इतर अनेक कॉंग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. विधानसभेच्या २७ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदारांचा पाठिंबा व राजीनामा बंद होईल असा विश्वास व्यक्त केला जात होता, परंतु अद्याप ते सुरूच आहे. पहिल्यांदा भगवानपुरा येथील अपक्ष आमदार केदार चिदाभाई डावार यांनी शिवराज सरकारला पाठिंबा जाहीर केला आणि आता कॉंग्रेसचे आमदार राहुलसिंग लोधी यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. कॉंग्रेस सतत भाजपावर घोडेबाजाराचा आरोप करत आहे. जर भाजपला अशा पद्धतीने आमदारांना विकत घ्यायचे असेल तर पोटनिवडणुका का घेत आहेत असा सवाल कॉंग्रेस नेते जेपी धनोपिया यांनी केला आहे.

दरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे गटाच्या तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. सभागृहाचे सदस्यत्व नसतानाही मंत्रिपदाच्या कार्यकाळाचे सहा महिने पूर्ण झाल्याने या दोन्ही मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन्ही मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारून ते राज्यपालांकडे पाठवले आहेत. तुलसी सिलावट आणि गोविंद राजपूत हे ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये दाखल झाले होते. तसेच ते पोटनिवडणुकही लढवत आहेत.

मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या २२ समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याने मार्च महिन्यात कमलनाथ सरकार कोसळले होते. तर भाजपाच्या दोन आमदारांचं निधन झाल्याने दोन जागा रिक्त झाल्या आहेत. तर अजून तीन आमदारांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारला होते. त्यामुळे रिक्त झालेल्या एकूण २७ मतदारसंघांमध्ये ३ नोव्हेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशBJPभाजपाcongressकाँग्रेसMLAआमदारElectionनिवडणूक