माणगाव : आपल्याला डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानातून मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निवडणूक प्रशासनाने युवक व युवतीचे फोटो लावून मतदान करावे, असे आवाहन केले आहे. मात्र, आपल्या विभागातील खासदार गीते यांनी सहा वेळा मतदान केले नाही यांचा आदर्श तरु णांनी घेऊ नये, असे प्रतिपादन रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी लोणेरे येथे महाआघाडीच्या प्रचारसभेत के ले.या वेळी सुनील तटकरे यांनी मोदी सरकार, शिवसेना आणि अनंत गीते यांच्यावर प्रखर शब्दात टीका केली. ते म्हणाले की, कष्टकरी जनतेला डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काम केले. अमेरिका, रशियासारखे बलाढ्य देश समोर असताना इंदिरा गांधींनी ‘भारत भी कुछ कम नही’ असे दाखवून दिले. राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केली. नरसिंहराव, मनमोहन सिंग यांनी देशाला स्थिरता देण्याचे काम केले; पण मोदी सरकारने जनतेला फसविण्याचे काम केले. या सरकारचे फक्त राज्यघटना बदलण्याचे काम सुरू असल्याचे तटकरे यांनी सांगितले.
'खासदार गीतेंनी सहा वेळा मतदान केले नाही'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 00:13 IST