येत्या १४ मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले. आणि या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. यापूर्वीही एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. याच रोषातून 'एमपीएससी'च्या उमेदवारांनी पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व 'एमपीएससी'चा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, यावर मंत्री विजय वडेट्टीवार यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करत विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेण्याचं आवाहन केलं आहे. "एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला या कोरोनाची पार्श्वभूमी तर आहेच. दुसरीडे मेटे यात तेल ओतण्याचं काम विनायक मेटेंकडून सुरू आहे. मराठा नेत्यांनी यात तेल ओतण्याचं काम करू नये. त्यांनी ज्या भाषेत वक्तव्य केलं ते चुकीचं आहे. प्रविण दरेकर यांनीदेखील आपलं वक्तव्य केलं की एसईबीसीच्या जागा सोडून इतर जागा भरण्यास हरकत नाही. हीच भावना राज्यातील ८० टक्के एससी, एसटी, एनटी अशा प्रवर्गातील विद्यार्थ्यांचीही आहे. अनेक वर्षे ही मुलं पुण्यात राहून अभ्यास करताय. मायबाप एकवेळ उपाशी राहून त्यांना मदत करत आहे की माझा मुलगा मुलगी कर्मचारी होईल, शासकीय सेवेत जाईल. पण गेल्या दोन वर्षांपासून यांना गृहीत धरलं जात असल्याचं वाटतं," असं वडेट्टीवार म्हणाले.
MPSC Exam Postponed : विजय वडेट्टीवार म्हणाले, "विद्यार्थी हताश, त्यांच्या भावना समजून घ्या"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 5:26 PM
MPSC Exam Postponed : हताश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्ग काढावा ही माझी हात जोडून विनंती असल्याचं वडेट्टीवार यांचं वक्तव्य
ठळक मुद्दे हताश झालेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्ग काढावा ही माझी हात जोडून विनंती : वडेट्टीवारमराठा नेत्यांनी तेल ओतण्याचं काम करून नये, वडेट्टीवार यांचं वक्तव्य