शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

Mumbai Electricity: पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे गेलेत? मुंबईतील खंडित वीजपुरवठ्यावरून भाजपा नेत्याचा सवाल

By बाळकृष्ण परब | Published: October 12, 2020 1:52 PM

mumbai electricity news : आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींनी दहा मिनिटे लाईट बंद करून दिवे पेटवण्याचा सल्ला दिला होता तेव्हा भरपूर सल्ले देणारे पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे आहेतया मंडळींकडे पॉवर ग्रिड कसा सांभाळावा याबाबत उद्धव ठाकरेंना देण्यासाठी कुठलाच सल्ला नाही आहे का?आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता

नवी दिल्ली - पॉवर ग्रिड फेल झाल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरामधील वीजपुरवठा आज सकाळपासून खंडित झाला होता. आता काही भागातील वीज आली असली तरी वीजपुरवठा पूर्णपणे सुरळीत होऊ शकलेला नाही. दरम्यान, आज मुंबईत झालेल्या पॉवर ग्रिडमधील बिघाडावरून भाजपा नेते अमित मालवीय यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.जेव्हा नरेंद्र मोदींनी दहा मिनिटे लाईट बंद करून दिवे पेटवण्याचा सल्ला दिला होता तेव्हा भरपूर सल्ले देणारे पॉवर ग्रिड तज्ज्ञ आता कुठे आहेत, आता या मंडळींकडे पॉवर ग्रिड कसा सांभाळावा याबाबत उद्धव ठाकरेंना देण्यासाठी कुठलाच सल्ला नाही आहे का? असा सवाल अमित मालविय यांनी विचारला आहे.

आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे उद्योगधंदे, कार्यालये तसेच लोकलसेवा पूर्णपणे ठप्प झाली होती. अर्ध्यावरच लोकल बंद झाल्याने अत्यावश्यक सेवेमधील कर्मचाऱ्यांना पायपीट करावी लागली. दरम्यान सुमारे अडीच तासांनंतर मुंबईतील काही भागांमधील वीजपुरवठा हा सुळळीत झाला. रीस्टोरेशनचे बहुतांश काम संपले असून, काही ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत दिल्या सूचनावीजपुरवठा खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली आणि मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करून अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीजपुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी, असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.

टॅग्स :MumbaiमुंबईelectricityवीजBJPभाजपाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार