मुंबई: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल, असे सांगितले जात आहे. यापैकी तीन नेत्यांनी आपल्या जनआशीर्वाद यात्रांना सुरुवात केली असून, केंद्रीयमंत्री नारायण राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन करून १९ ऑगस्ट रोजी जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून, ही जनआशीर्वाद नाही तर जन छळवणूक यात्रा असल्याचा टोला लगावण्यात आला आहे. (mumbai mayor kishori pednekar criticised bjp over jan ashirwad yatra)
TATA ग्रुप आता ‘ही’ सरकारी कंपनी खरेदी करण्यास इच्छुक; केंद्राने दिली तत्त्वतः मंजुरी!
मुख्यमंत्री टॉप फाईव्हमध्ये आले. ही विरोधकांना जबरदस्त चपराक आहे. काम केले म्हणून ते नंबर पाचमध्ये आले. विरोधकांचे मीठ आळणीच राहिले आहे. मातोश्रीने करून दाखवले. त्यामुळे मातोश्री टार्गेट राहणारच, पण विरोधकांनी मातोश्रीकडे लक्ष न देता, लसीकरणाकडे द्यावे. तसेही आम्हाला कुणी टार्गेट केले तरी काही फरक पडत नाही, असा टोला मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. तसेच भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरही त्यांनी टीका केली आहे.
धक्कादायक! देशात Covishield च्या बनावट लसी सापडल्या; WHO ने दिला गंभीर इशारा
ही तर ‘जन छळवणूक यात्रा’
कोरोनाच्या काळात जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली आहे. पण जनता त्यांना आशीर्वाद देणार नाही. जनताच भाजपला त्रासली आहे. त्यामुळे जन आशीर्वाद मिळणार नाहीत. ही कसली जन आशीर्वाद यात्रा? ही तर जन छळवणूक यात्रा आहे, या शब्दांत किशोरी पेडणेकर यांनी भाजपच्या या यात्रेची खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्रातील मंदिरे उघडी करण्यात आलेली नाही. राज्याबाहेरची मंदिरे उघडी आहेत. तिथे काळजी घेतली जातेय. पण मंदिरे उघडण्यापेक्षा विरोधकांनी दिल्लीतून व्हॅक्सिन आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असा चिमटाही पेडणेकर यांनी काढला. त्या टीव्ही९ शी बोलत होत्या.
“मला तुझी एक गोष्ट पटली नाही”; ऑलिम्पिक पदक विजेत्या रवीवर PM मोदी नाराज!
दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे ७ दिवस चालणाऱ्या जनआशीर्वाद यात्रेत एकूण १७० हून अधिक भागांना भेट देणार आहेत. दिल्लीतील भाजप नेतृत्वाने नारायण राणेंकडे कोकण आणि मुंबईची जबाबदारी दिली असून, मुंबई महापालिकेची निवडणूक पुढच्या वर्षी होत असल्याने मिशन ११४ ची जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिकेत ११४ जागा किंवा त्याहून अधिक जागा निवडून आणण्याची जबाबदारी देण्यात आली असून, कोणत्याही परिस्थितीत हे मिशन यशस्वी करा, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेला शह देण्यासाठी नारायण राणेंकडे मिशन देण्यात आले असून, महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरोधात राणेंच्या ताकदीचा पुरेपूर वापर करून घेण्याचे भाजपने ठरवल्याचे सांगितले जात आहे.