''मुस्लिम लीग' म्हणजे व्हायरस, काँग्रेसही संक्रमित'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 03:40 PM2019-04-05T15:40:54+5:302019-04-05T15:41:25+5:30

योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे.

'Muslim League' means Virus, Congress Infected ' |  ''मुस्लिम लीग' म्हणजे व्हायरस, काँग्रेसही संक्रमित'

 ''मुस्लिम लीग' म्हणजे व्हायरस, काँग्रेसही संक्रमित'

googlenewsNext

नवी दिल्ली- योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना असं म्हटल्याचा वाद थंड होत नाही, तोच योगींनी मुस्लिम लीगच्या आडून मुस्लिमांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आक्रमक प्रचार करत असून, विरोधी पक्षांना धारेवर धरत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम लीगला व्हायरस असं म्हटलं आहे. तसेच या व्हायरसनं काँग्रेस संक्रमित झाल्याचीही टीकाही त्यांनी केली आहे. तर कालच राहुल गांधींवर हल्लाबोल करताना योगी म्हणाले होते की, केरळमध्ये देशाचं विभाजन करू पाहणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर काँग्रेसचा गुप्त अजेंडा आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लिम लीगवर जहरी टीका केली आहे. मुस्लिम लीग म्हणजे एक प्रकारचा व्हायरस आहे. जर अशी लोक जिंकली तर देशाचं काय होईल, हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल, अशी भीती योगींनी व्यक्त केली आहे.


उत्तराखंडमधल्या काशीपूरमधील रॅलीत योगी म्हणाले, देशाला शेकडो वर्षांनी 1947 स्वातंत्र्यता मिळाली. परंतु स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येलाच आपल्या देशाचं दुर्भाग्यपूर्ण पद्धतीनं विभाजन करण्यात आलं. मुस्लीम लीगमुळेच देशाचं विभाजन झालं. राहुल गांधींनी केरळमधून उमेदवारी अर्ज भरला असून, त्याचा मुस्लिम लीगबरोबर सीक्रेट अजेंडा आहे. हे ती संघटना आहे, जी देशाच्या विभाजनाचं कारण ठरली. काँग्रेसचा मुस्लिम लीगबरोबर असलेला सीक्रेट अजेंडा देशाला कुठे घेऊन जाणार आहे आणि काँग्रेस देशात कशा प्रकारच्या वातावरणाची निर्मिती करू इच्छिते.
अफस्पा हटवून काँग्रेस सुरक्षा यंत्रणांना कमजोर करू इच्छिते. काँग्रेसनं स्वतःची आत्मा आणि स्वाभिमान देशद्रोही आणि फुटीरतावाद्यांकडे गहाण ठेवला आहे. काँग्रेसला फुटीरतावादी आणि दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर काम करायचं आहे. उत्तराखंडातल्या अनेक गावातल्या मुलांनी देशसेवेला प्राधान्य दिलं आहे. जाहीरनाम्यात काँग्रेसनं देशद्रोही कलम 124 ए संपवण्याच्या दिलेल्या आश्वासनावर योगींनी टीका केली आहे. 

Web Title: 'Muslim League' means Virus, Congress Infected '

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.