नवी दिल्ली- योगी आदित्यनाथ यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा सिलसिला कायम ठेवला आहे. भारतीय लष्कराला मोदींची सेना असं म्हटल्याचा वाद थंड होत नाही, तोच योगींनी मुस्लिम लीगच्या आडून मुस्लिमांवर टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आक्रमक प्रचार करत असून, विरोधी पक्षांना धारेवर धरत आहेत. योगी आदित्यनाथ यांनी मुस्लिम लीगला व्हायरस असं म्हटलं आहे. तसेच या व्हायरसनं काँग्रेस संक्रमित झाल्याचीही टीकाही त्यांनी केली आहे. तर कालच राहुल गांधींवर हल्लाबोल करताना योगी म्हणाले होते की, केरळमध्ये देशाचं विभाजन करू पाहणाऱ्या मुस्लिम लीगबरोबर काँग्रेसचा गुप्त अजेंडा आहे. आदित्यनाथ यांनी मुस्लिम लीगवर जहरी टीका केली आहे. मुस्लिम लीग म्हणजे एक प्रकारचा व्हायरस आहे. जर अशी लोक जिंकली तर देशाचं काय होईल, हा व्हायरस पूर्ण देशात पसरेल, अशी भीती योगींनी व्यक्त केली आहे.
''मुस्लिम लीग' म्हणजे व्हायरस, काँग्रेसही संक्रमित'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 15:41 IST